Headlines

युद्ध सुरू असतानाच भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेमुळे मोठं संकट टळलं, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध सुरू असतानाच भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेमुळे मोठं संकट टळलं, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
युद्ध सुरू असतानाच भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेमुळे मोठं संकट टळलं, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा


युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि अमेरिकेचं देखील प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत या युद्धामध्ये अमेरिकेकडून प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान या युद्धामुळे संपूर्ण जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. इराणकडून होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देण्यात आली आहे. या सामुद्रधुनी मार्गे जगभरातील सुमारे 25 टक्के इंधनाची वाहतूक होते. जर इराणने ही सामुद्रधुनी बंद केली तर जगावर मोठं इंधन संकट निर्माण होऊ शकतं. पेट्रोल, डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

मात्र आता या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी इराणने दिल्यानंतर त्यावर आता ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचे सैन्य या मार्गावरील तेल टँकरांना सुरक्षा देतील, त्यामुळे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी खंडित होणार नाही. आम्ही त्याची काळजी घेऊ, कोणत्याही देशात यामुळे ऊर्जा संकट तयार होणार नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. आम्ही या मार्गाने जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या टँकरला संरक्षण देऊ, काहीही झालं तर आम्ही असा शब्द देतो की, संपूर्ण जगाला कच्च्या तेलाचा पुरठवा सुरळीत सुरू राहील, त्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते असंही म्हटलं की, मी संयुक्त राज्य विकास वित्त निगम (डीएफसी) असा आदेश देखील दिला आहे की, या प्रदेशातून जे तेल वाहतूक जहाजे जातात, त्यांना योग्य मोबदल्यात विम्याचे सुरक्षाकवच तत्काल प्रभावाने उपलब्ध करून द्यावेत, त्यामुळे आता तेला व्यापाऱ्यांना कोणतंही घाबरण्याचं कारण नाही.

दरम्यान जर इराने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केली तर त्याचा मोठा फटका हा भारताला देखील बसणार आहे, कारण कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊन इंधनाच्या किमंती भडकण्याची शक्यता आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या नव्या घोषणामुळे भारताची मोठी चिंता दूर होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *