युद्ध सुरू असतानाच सर्वात मोठी बातमी; तेलाचं घबाड असलेल्या या देशात फडकला अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांचा मोठा विजय

युद्ध सुरू असतानाच सर्वात मोठी बातमी; तेलाचं घबाड असलेल्या या देशात फडकला अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांचा मोठा विजय
युद्ध सुरू असतानाच सर्वात मोठी बातमी; तेलाचं घबाड असलेल्या या देशात फडकला अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांचा मोठा विजय


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये. इराने आपल्या मिसाइल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला आहे. इराणकडून करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणकडून अमेरिकेच्या आखाती देशातील सैन्य तळांवर देखील भीषण हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेले असून, अमेरिकेचं मोठं नुकसान झाला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धामध्ये अमेरिकेसाठी कोणतीही चांगली गोष्ट घडताना दिसून येत नाहीये. परंतु दुसरीकडून मात्र आता अमेरिकेसाठी एका दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

हा डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा कुटनितीक विजय मानला जात आहे. इराणवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. हे युद्ध अमेरिकेनं अवघ्या काही तासांमध्येच संपवलं. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. त्यानंतर आता व्हेनेझुएलावर आपली सत्ता आहे, असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. मात्र अमेरिकेच्या या कारवाईमुळे व्हेनेझुएलामध्ये मोठा तणाव होता. अमेरिकेविरोधात असंतोषाची भावना होती. मात्र आता हा विरोध निवळला असल्याचं पहायला मिळत आहे. व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेचा झेंडा फडकला आहे. शनिवारी तब्बल सात वर्षांनंतर तेथील अमेरिकेच्या दूतावासावर अमेरिकेचा झेंड फडकला आहे. अमेरिकेकडून व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली, मात्र त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे नवे राष्ट्रपती डेल्सी रोड्रिग्ज यांना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान सात वर्षांनंतर व्हेनेझुएलावर भूमीवर अमेरिकेचा झेंडा फडकला आहे. यावर व्हेनेझुएलाच्या नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी या कृतीचं स्वागत केलं आहे, तर काही जणांचा मात्र अजूनही डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध आहे. व्हेनेझुएलाकडे तेलाचे प्रचंड साठे आहेत, या तेलाच्या राजकारणात अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपावरून काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान आता अमेरिकेकडून या तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण प्रस्तापीत केलं जाण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *