रशियाला झटका! भारतामुळे होणार प्रचंड नुकसान, अमेरिकेसोबत करार होताच मोठी अपडेट समोर

रशियाला झटका! भारतामुळे होणार प्रचंड नुकसान, अमेरिकेसोबत करार होताच मोठी अपडेट समोर
रशियाला झटका! भारतामुळे होणार प्रचंड नुकसान, अमेरिकेसोबत करार होताच मोठी अपडेट समोर


Russia Oil : भारत आणि अमेरिका यांच्यात आता व्यापार करार झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या व्यापार कराराविषयी चर्चा चालू होती. हा करार घडवून आणण्यासाठी दोन्ही देशांत अनेक बैठका पार पडल्या होत्या. भारत आणि अमेरिका यांच्यात हा करार झाल्यानंतर आता अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला आहे. भारतानेही अमेरिकेला व्यापाराच्या बाबतीत अनेक सवलती देऊ केल्या आहेत. दरम्यान असे असतानाच आता भारत रशियाकडून तेलाची खरेदी कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तेल खरेदी कमी करा, अनौपचारिकरित्या सांगितलं

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर आता भारत रशियाकडून तेलाची खरेदी हळू-हळू कमी करण्याची शक्यता आहे. नायरा एनर्जी यासारखी तेल रिफायनरी कंपनी सध्यातरी रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करणार नाही. भारतातील तेल कंपन्यांना अद्याप रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा थेट आणि औपचारिक आदेश मिळालेला नाही. मात्र अनौपचारिकरित्या या कंपन्यांना रशियाकडून तेलखरेदी कमी करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या अगोदरच अनेक भारतीय तेल कंपन्यांनी अगोदरच रशियाकडून तेल खरेदी कमी केलेली आहे.

या कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल), मंगलोर रिफाइनरी अँज पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल), एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेड (एचएमईएल) या कंपन्यांनी अमेरिकेने रशियावर निर्बंध लादल्यानंतर लगेच रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती. आता लवकरच डियन ऑयल कॉर्पोरेशन (आईओसी) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या कंपन्यादेखील रशियाकडून हळूहळू तेल खरेदी बंद करणार आहेत. भारतातील सर्वात मोठी तेल खरेदी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज लमिटेड ही कंपनीदेखील रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांत या कंपनीला रशियाकडून 1,50,000 बॅरल्स तेल मिळणार आहे. हा व्यावहार पूर्ण झाल्यावर रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *