Headlines

लिंग पिसाट अशोक खरात याच्या 10 वीच्या निकालाची प्रत tv9 च्या हाती, पाहा निकाल, थेट..

लिंग पिसाट अशोक खरात याच्या 10 वीच्या निकालाची प्रत tv9 च्या हाती, पाहा निकाल, थेट..
लिंग पिसाट अशोक खरात याच्या 10 वीच्या निकालाची प्रत tv9 च्या हाती, पाहा निकाल, थेट..


नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे. काल स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरातचे काळे कारनामे उघड केले. पोलिसांकडून अशोक खरातची चाैकशी केली आहे. सात गुन्हे आतापर्यंत त्याच्यावर दाखल करण्यात आले. महिलांवर लैगिंक अत्याचार करतानाचे त्याचे काही फोटोही पुढे आली आहेत. हेच नाही तर राज्यातील सनदी अधिकारी आणि बड्या नेत्यांसोबत त्याचे घरचे संबंध होते. पोलिसांच्या हाती लैंगिक अत्याचार करतानाचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ लागली आहेत. अशोक खरात याचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट आहे. विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भोंदू अशोक खरात याला अत्यंत शिताफीने पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे अत्यंत गुप्तता पाळत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून भीती घालून हा महिलांवर अत्याचार करत. लहान मुली, गरोदर महिला देखील या लिंग पिसाट अशोक खरातने सोडल्या नाहीत.

हेच नाही तर अशोक खरात याने काही नरबळी दिल्याचेही सांगितले जात आहे. याबाबतची चाैकशी सध्या सुरू आहे. अशोक खरात याच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली. भोंदू अशोक खरातबाबत शैक्षणिक खुलासा झाला. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल असल्याची मोठी माहिती पुढे आली. यासोबतच अशोक खरात याने आपले नावही बदलले आहे

अशोक खरातचे खरे नाव अशोक खरात नाही, त्याचे हे नाव बदलून घेतलेले आहे. अशोक खरात हा दोन विषयांत नापास दहावीत झाला. विशेष म्हणजे त्याचा गणित हा विषय गेला होता. अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा, पण दहावीत तो गणितातच नापास होता.  शाळेच्या नोंदीत मूळ नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असे भोंदू अशोक खरातचे आढळून आले आहे.

त्याने नंतर नाव बदलून अशोककुमार केल्याची शक्यता आहे. 1983 च्या दहावी परीक्षेत त्याला फक्त 35,86 टक्के गुण मिळाले होते.  तरीही भविष्य आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. दहावी पास असलेल्या अशोक खरात याने मोठी जंगी मालमत्ता लोकांना पागल बनून कमावली. राज्यातील अनेक भागात भोंदू खरातच्या मालमत्ता आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *