Headlines

विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे, एनसीपीच्या बड्या नेत्याचे खासगीत विधान

विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे, एनसीपीच्या बड्या नेत्याचे खासगीत विधान
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे, एनसीपीच्या बड्या नेत्याचे खासगीत विधान


ज्यांना विलीनीकरण करायचे आहे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे यावे दादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने खाजगीत हे विधान केले आहे. विलीनीकरणाची चर्चा प्रत्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी करावी. लोकशाहीत चर्चेला महत्व असते. मात्र ही चर्चा एकांगी नसावी असेही या नेत्याने म्हटले आहे. अजित दादा पवार यांचा २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येताना विमान कोसळून बारामती येथे अकस्मात मृत्यू झाला होता. त्याआधी शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या एकत्र येण्यावरुन अनेकदा चर्चा झाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या होत्या. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा मागे पडली. शरद पवार गटाकडून मात्र वारंवार विलीनीकरणाचा आग्रह धरला जात होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाल्यानंतर ही विलीनीकरणाची चर्चा आता थांबल्याचे शरद पवार गटातील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *