Headlines

विवाहित अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध… बायकोकडून सर्वांसमोर अभिनेत्रीचा अपमान आणि ‘घाणेरड्या बाई’चा टॅग, आज इतक्या संपत्तीची मालकीण

विवाहित अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध… बायकोकडून सर्वांसमोर अभिनेत्रीचा अपमान आणि ‘घाणेरड्या बाई’चा टॅग, आज इतक्या संपत्तीची मालकीण
विवाहित अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध… बायकोकडून सर्वांसमोर अभिनेत्रीचा अपमान आणि ‘घाणेरड्या बाई’चा टॅग, आज इतक्या संपत्तीची मालकीण


सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. विवाहित अभिनेत्यासोबत एखाद्या अभिनेत्रीचे प्रेमसंबंध असतील तर, त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं आहे, जी आज कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. पण जेव्हा अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र पसरल्या होत्या, तेव्हा अभिनेत्याच्या बायकोने सर्वांसमोर अभिनेत्रीचा अपमान केलेला आणि ‘घाणेरड्या बाई’चा टॅग देखील दिला. सध्या ज्या सेलिब्रिटींच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, अभिनेता – कोरिओग्राफर प्रभूदेवा आणि अभिनेत्री नयनतारा आहे…

प्रभूदेवा आणि नयनतारा आज त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे. पण तरी देखील त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सुरु असतात. प्रभूदेवा याच्यासोबत अफेअर असल्यामुळे नयनतारा हिला फक्त कायदेशीर लढाया लढाव्या लागल्या नाही तर, सर्वत्र होणारा अपमान देखील सहन करावा लागला…

प्रभूदेवा आणि नयनतारा यांच्या अफेअरची चर्चा अभिनेत्याच्या बायकोपर्यंत पोहोचल्यानंतर, नयनतारा हिला टिकेचा सामना करावा लागला… तेव्हा प्रभूदेवा याची पहिली पत्नी लता प्रचंड रागात होती… सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाद टोकाला पोहोचल्यानंतर, लता हिने पती प्रभूदेवा याला प्रामाणिक व्यक्ती असल्याचं सांगितलं… जे प्रत्येक पत्नी करते…

पण प्रकरण तोपर्यंत टोकाला पोहोचलं होतं. प्रभूदेवा याने लग्न संपवण्यासाठी कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. तेव्हा तामिळनाडूतील अनेक महिला संघटनांनी नयनतारावर तामिळ संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यांना कमी लेखल्याचा आरोप करत तिच्या विरोधात आंदोलन केलं.

प्रभू देवासोबतचं तिचं प्रेमप्रकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे नयनताराच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. तिने चित्रपटसृष्टीतून काही काळासाठी ब्रेकही घेतला, पण तिने पुनरागमन केलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून स्वतःचं नाव मोठं केलं.

अभिनेता शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमातून नयनतारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. आज नयनतारा तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आयुष्य जगत आहे. पती विग्नेश शिवन आणि जुळ्या मुलांसोबत अभिनेत्री आनंदी आहे… नयनतारा हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, तिच्याकडे रिपोर्टनुसार, 250 कोटी रुपयांची आहे. शिवाय अनेक महागड्या गाड्या देखील आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *