Headlines

विशाल मला हात लावू नकोस… ‘बिग बॉस’च्या घरात राडा…, ‘मुलींना हात लावतो जशी त्याची प्रॉपर्टी…’

विशाल मला हात लावू नकोस… ‘बिग बॉस’च्या घरात राडा…, ‘मुलींना हात लावतो जशी त्याची प्रॉपर्टी…’
विशाल मला हात लावू नकोस… ‘बिग बॉस’च्या घरात राडा…, ‘मुलींना हात लावतो जशी त्याची प्रॉपर्टी…’


Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात आता प्रत्येक स्पर्धकांचा खेळ रंगात येत आहे. प्रत्येक जण स्वतःला सेफ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आङे. अशात बिग बॉसच्या घरात गणिताचा तास सुरु असताना राडा झाला. गणिताच्या तासात विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही तर, राडाच केला… ‘बिग बॉस’ने सोशल मीडियावर नव्या एपिसोडचा प्रोमो तयार केला आहे. ज्यामध्ये विशाल कोटियन याने असं काही केलं, ज्यामुळे घरातील वातावरण तापलं. एवढंच नाही तर, नेटकऱ्यांनी देखील विशाल यांच्या निशाणा साधला आहे.

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, टास्कमध्ये प्रत्येकाने पाठीवरून बॉल पुढे न्यायचा होता. या खेळात प्रत्येत स्पर्धक स्वतःची खेळी जोरदार खेळत असताना मागून अचानक विशाल आला आणि त्याने राखीला उचललं… विशाल, राखीला उचलतो आणि स्विमिंग पूल जवळ घेऊन जातो… त्यानंतर विशाल म्हणतो, ‘अगली बार डाल दुंगा… माँ कसम…’, म्हणजे पुढच्या वेळी आईची शपथ घेऊन सांगतो, पुढच्या वेळी फेकून देईल…’, विशाल याने मागून उचलल्यामुळे राखी प्रचंड संतापते…

राखी संतापता विशाल याला म्हणते, ‘विशाल तुला ही लास्ट वॉर्निंग आहे… मला हात लावू नको…’ असं स्पष्ट शब्दात अभिनेत्री सांगते… रागाच्या भरात ती जवळचं टेबलही ढकलून देते. या प्रसंगामुळे घरातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झाल्याचं दिसत आहे. राखी आणि विशाल यांच्या वादाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. “तो मुलींना स्वतःची प्रॉपर्टी समजतो का?” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. विशालला नॉमिनेशनमध्ये टाका म्हणजे त्याला कळेल… असं देखील एक नेटकरी म्हणाला आहे. तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘बिग बॉस आता यावर काय निर्णय घेणार…’, घडलेल्या प्रसंगानंतर आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार पाहणं  महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण जाणार घराबाहेर?

बिग बॉसच्या आतापर्यत चाहत्यांच्या आवडते सदस्य बाहेर गेले आहेत आणि आता सातव्या आठवड्यात नॉमिनेशन्सच्या यादीत राकेश बापट, रोशन भजनकर, राखी सावंत आणि प्राजक्ता शुक्रे यांची नावे आहेत. त्यामुळे सातवा आठवडा कोणासाठी शेवटचा आठवडा ठरु शकतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *