Headlines

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारतासोबत मोठा दगाफटका, थेट पाकिस्तानला..

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारतासोबत मोठा दगाफटका, थेट पाकिस्तानला..
शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारतासोबत मोठा दगाफटका, थेट पाकिस्तानला..


इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देश संकटात आहेत. रशियाकडून तेल खरेदी भारत करत असल्याने मोठा टॅरिफ काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने भारतावर लावला. आता तेच डोनाल्ड ट्रम्प रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन अनेक देशांना करत आहेत. अगोदर रशिया भारताला एकदम स्वस्त दरात तेल विक्री करत. मात्र, आता इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाले आणि तेलाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. यादरम्यान भारताला खऱ्या अर्थाने रशियाच्या पाठिंब्याची गरज आहे, त्यावेळी रशिया अनेक वर्षांची मैत्री विसरून भारताला तेलावर देण्यात आलेली सर्व सूट काढून बाजार भावाप्रमाणेच तेल खरेदी करावी लागणार सांगत आहे. त्याचप्रमाणे भारत खदेरीही करत आहे. मात्र, दुसरीकडे रशियाने पाकिस्तानला तेल खरेदी करण्याचा मोठा प्रस्ताव दिला. फक्त प्रस्तावच नाही तर पाकिस्तानला तेलावर मोठी सूट भेटणार असल्याचेही त्यांनी म्हटले. हा भारतासाठी रशियाकडून सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल.

कारण एकीकडे भारताला बाजार भावाप्रमाणे रशिया तेल विक्री करत आहे तर दुसरीकडे मात्र, पाकिस्तानला सवलतीमध्ये तेल निर्यात करण्याचा प्रस्ताव देत आहे. पाकिस्तानमधील रशियाचे राजदूत अल्बर्ट खोरेव यांनी सांगितले की, रशियन फेडरेशन पाकिस्तानला सवलतीच्या दरात तेल पुरवठा करण्यास तयार आहे. तेल सवलतीत दिले जाईल आणि पाकिस्तानने या संधीचा फायदा घ्यावा.

इराण युद्धात अनेक देश संकटात आहेत, तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच हा मोठा प्रस्ताव रशियाकडून पाकिस्तानला देण्यात आला. अल्बर्ट खोरेव यांनी म्हटले की, पाकिस्तानने औपचारिकपणे त्यांच्या देशाशी संपर्क साधला, तर मॉस्को सवलतीच्या दरात तेल विकेल. म्हणजेच थोडक्यात काय तर रशिया पूर्णपणे सवलतीच्या दरात पाकिस्तानला कच्चे तेल देण्यास तयार आहे.

पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यावर रशियन दूतावासांनी भर दिला. या क्षेत्रातील कोणतीही प्रगती इस्लामाबादने संवाद सुरू करण्यावर अवलंबून असेल, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानला तेल पुरवठ्याबाबत रशियाची भूमिका सकारात्मक आहे. भारताला तेलावर जितकी सवलत दिली जात नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त सवलत पाकिस्तानला देण्याचा प्रस्ताव रशियाचा आहे. यामुळे आता भारत आणि रशियाचे संबंध तणावात येण्याची दाट शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *