शुभमंगल सावधान! अखेर रश्मिका मंदाना काही तासातच सुपरस्टारशी करणार लग्न? Video Viral

शुभमंगल सावधान! अखेर रश्मिका मंदाना काही तासातच सुपरस्टारशी करणार लग्न? Video Viral
शुभमंगल सावधान! अखेर रश्मिका मंदाना काही तासातच सुपरस्टारशी करणार लग्न? Video Viral


Rashmika Mandanna-Vijay Deverakonda wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधून समोर आलेल्या एका नव्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून या जोडप्याचे लग्न आधी चर्चेत असलेल्या तारखेपेक्षा लवकरच, म्हणजेच याच आठवड्यात होणार असल्याचे दावे केले जात आहेत.

इन्स्टाग्रामवर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की उदयपूरमधील ऐतिहासिक सिटी पॅलेस येथे रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. या व्हिडिओनुसार, हे लग्न 2 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांच्या लग्नाची तारीख 26 फेब्रुवारी असल्याचे बोलले जात होते. मात्र आता ही तारीख बदलण्यात आल्याचा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे.

रश्मिका-विजय लवकरच अडकणार विवाहबंधनात?

व्हिडिओमध्ये दोन तरुणी आपण त्या महालातच उपस्थित असल्याचा दावा करताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांनी सिटी पॅलेसमधील कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असून, त्या कर्मचाऱ्यांनी कथितपणे लग्नाची तारीख आणि ठिकाणाची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या प्राथमिक तयारीचे काही दृश्यही पाहायला मिळत असून त्यामुळे चाहत्यांच्या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.

मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा किंवा सिटी पॅलेस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून चाहते प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

काही दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा

दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका आणि विजय यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हैदराबादमधील विजय देवरकोंडाच्या निवासस्थानी एका खासगी समारंभात साखरपुडा केला होता. या सोहळ्याला केवळ दोन्ही कुटुंबांतील अत्यंत जवळचे सदस्य उपस्थित होते. मात्र या साखरपुड्याबाबतही दोघांनी कधीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

या सगळ्या घडामोडींमुळे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, आता चाहत्यांचे लक्ष अधिकृत घोषणेकडे लागले आहे. तोपर्यंत सोशल मीडियावर या चर्चांचा जोर कायम राहण्याचीच शक्यता आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *