संघाची नियुक्तीची प्रक्रिया कशी असते… मोहन भागवत यांनी सांगितला संपूर्ण क्रम

संघाची नियुक्तीची प्रक्रिया कशी असते… मोहन भागवत यांनी सांगितला संपूर्ण क्रम
संघाची नियुक्तीची प्रक्रिया कशी असते… मोहन भागवत यांनी सांगितला संपूर्ण क्रम


संघात निवृत्ती कशी होते? एससी एसटी समाजातील व्यक्ती सरसंघचालक होऊ शकतो का? यावर बोलताना मोहन भागवत यांनी म्हटले की, निवृत्ती की नियुक्ती हे माझ्या लक्षात आलं नाही. संघाचे जनरल सेक्रेटरी दत्तात्रय होसबळे आणि क्षेत्राचे, प्रांताचे, जिल्ह्यांचे संघचालक यांची तीन वर्षातून निवडले जातात. त्यांना निवडणाऱ्या मतदारांचीही स्वयंसेवकातून निवड केली जाते. 50 स्वयंसेवकाच्या मागे एक प्रांतप्रतिनिधी असतो आणि 40 प्रांत प्रतिनिधींच्या मागे एक अखिल भारतीय प्रतिनिधी असतो. अखिल भारतीय प्रतिनिधी सरकार्यवाह आणि क्षेत्र संघचालकांची निवड करतात. त्यांच्यासोबत प्रांतिनिय प्रतिनिधी मिळून प्रांत विभाग आणि जिल्हा संघचालकांची निवड करतात. बाकी सर्व लोकांची नियुक्ती हे लोक करतात. अपवाद फक्त सरसंघचालक. सरसंघचालक पुढच्या सरसंघचालकाची नियुक्ती करतात. हे श्रद्धेचं स्थान मानलं जातं. तिथे निवडणुका होत नाही. तिथे जे असतात त्याच्या प्रती लोक श्रद्धा ठेवतात. हा व्यक्तीचा मान नसतो. तर आसनाचा मान असतो. आता नियुक्ती अशी होते. निवृत्ती कधीही होते. कार्यापासून निवृत्ती कधी होत नाही. मरेपर्यंत काम करणारी लोक आहेत. शरीर चालतं तोपर्यंत काम करतात. वयाच्या 75 नंतर विना दायित्त्वाचं काम केलं पाहिजे, असं आम्ही मानतो. त्याला संघाची परवानगी मिळाली तर होईल.

माझं सांगायचं म्हणजे मला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. मी कार्यकर्त्यांना म्हणालो, झालं आता. ते म्हणाले, तुम्हाला काय झालं? फिरत आहात. काम करा अजून. त्यामुळे मी थांबलो. मी इथे असावं ही माझी इच्छा नाही. कार्यकर्त्यांची राहत नाही. मी या ठिकाणी राहू नये हा माझा ऑप्शन नाही. हा संघाचा ऑप्शन आहे. त्यामुळे संघ जेव्हा सांगेल तेव्हा दायित्वातून निवृत्ती होते. कार्यातून निवृत्ती नाही. दायित्त्वातून निवृत्ती झाली तरी कार्य सुरूच राहतं. शरीराची सक्रियता असे पर्यंत काम सुरू राहतं. निवृत्तीची वयोमर्यादा नाही. एखादा व्यक्ती जेव्हा म्हणतो मला निवृत्त व्हायचं आहे, तेव्हा कारण पाहून निवृत्ती दिली जाते. निवृत्त करावं कुणाला अशी वेळ आली नाही. अशी वेळ येऊ नये ही इच्छा आहे.

संघ का सरसंघचालक कोण व्हावं? एखादा ब्राह्मण संघाचा सरसंघचालक होत नाही. एखादा क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र संघाचा ससरसंघचालक होत नाही. जो हिंदू आहे, तोच संघाचा सरसंघचालक होईल. सरसंघचालक एसएसटी आहे तरी होऊ शकतो नसेल तरी होऊ शकतो. जात पाहून सरसंघचालक ठरवला जात नाही. जो काम करतो तो होणार. पूर्वी संघ छोटा होता. एकच वस्ती होती. ब्राह्मण वस्ती होती. त्यामुळे सुरुवातीला सर्व पदाधिकारी ब्राह्मण होते. तेव्हा लोक म्हणायचे ब्राह्मणांचा संघ आहे. आम्ही नाही म्हणायचो. पण ऐकायचे नाही. पण संघ वाढला. आम्ही जातीपातीवर संघ वाढवत नाही.

आम्ही भौगोलिक परिस्थितीवर संघ वाढवतो. दहा दहा हजाराची वस्ती असते. दहा दहा बारा गावांचा ग्रुप असतो. मंडल म्हणतो त्याला. त्या प्रत्येक मंडलात काम होतं. अखिल भारतीय स्तरावर सर्व जातीचे लोक आहेत. एकाच जातीचे लोक नाही. सर्व जातीचे लोक संघात असतील. कारण काम होत राहणार. त्यामुळे उद्या एससी, एसटी सरसंघचालक होणार की नाही सांगू शकत नाही. त्याचं उत्तर देऊ शकत नाही. ज्याला करायचे तो विचार करेल.

पुढे बोलताना मोहन भागवत यांनी म्हटले की, मला जेव्हा करायचे असेल तेव्हा मी विचार करेल. पण योग्य कोण आहे. असलेल्यांपैकी बेस्ट कोण आहे याचा मी विचार करेन. बेस्ट असावा आणि अव्हेलेबल असावे. मी सरसंघचालक आहे. बेस्ट आणखी आहेत. पण मी अव्हेलेबल आहे. ज्याला खाली केलं जाऊ शकतो तो मी एकटाच होतो. त्यामुळे मला बनवलं. त्यामुळे एससी एसटी असणं हे डिस्क्वॉलिफिकेशन नाही. किंवा ब्राह्मण असणं हे क्वॉलिफिकेशन नाही. तर जो उपलब्ध आहे आणि बेस्ट आहे तोच होणार. त्यामुळे एससी एसटीही होऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *