Headlines

संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप!

संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप!
संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप!


America Petrol Diesel Price : इराण युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसत आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सोबतच घरगुती गॅस सिलिंडरही महागला असून तो वेळेवर मिळत नाहीये. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अमेरिकेकडून इराणला धमकावले जात आहे. इराण मात्र माघार घेण्यास तयार नाही. अजूनही इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंदच ठेवलेली आहे. असे असतानाच आता संपूर्ण जगाप्रमाणेच अमेरिकेलाही युद्धाचे जबर चटके बसायला सुरूवात झाली आहे. या युद्धामुळे अमेरिकेतही इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. यामुळे आता अमेरिकन नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

अमेरिकेत नेमकं काय घडतंय?

इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्यासाठी इस्रायलसोबतच अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतलेली आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इराणला अनेकदा थेट धमकावले आहे. दरम्यान, अमेरिकेने या युद्धात उडी घेतल्यामुळे येथील जनतेला त्याचा फटका ब सत आहे. येथे पेट्रोलचा भाव 1 डॉलरने तर डिझेलचा भाव 1.89 डॉलरने वढला आहे. या युद्धामुळे कृषी तसेच उद्योग जगतावरही मोटा परिणाम होत आहे. अमेरिकेचे रोज लाखो डॉलर्सचं नुकसान होत आहे.

पेट्रोलचा भाव नेमका किती वाढला?

इंधनाचा भाव वाढल्याने आता अमेरिकेत अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने आपल्या सेवा पुरवताना अतिरिक्त फी घेण्याचे जाहीर केले आहे. तर अमेरिकेतील प्रमुख विमान वाहतूक कंपनीनेही विमानाच्या तिकीट दरात वाढ केली आहे. अमेरिकेत पेट्रोलचा भाव सरासरी 4.09 डॉलर्स प्रति गॅलनवर (3.8 लिटर) पोहोचला आहे. ऑगस्ट 2022 नंतर अमेरिकेतील हा पेट्रोलचा सर्वाधिक भाव आहे. डिझेलचा भाव गेल्या वर्षी 3.64 डॉलर प्रति गॅलन होता. आता हाच भाव 5.53 अमेरिकन डॉलर प्रति गॅलनपर्यंत वाढला आहे. डिझेलचा उपयोग कृषी क्षेत्र, निर्मिती क्षेत्र, परिवहन क्षेत्रात केला जातो. त्यामुळे या सर्वच सेवा महागणार आहेत.

दुसरीकडे ऑनलाई रिटेलर अॅमेझॉननेही येत्या 17 एप्रिल रोजीपासून थर्ड पार्टी सेलरच्या डिलिव्हरीवर 3.5 टक्के इंधन आणइ लॉजिस्टिक चार्जेस लागू करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, आता अमेरिकेत ही महागाई वाढल्याने ट्रम्प काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *