Headlines

सर्वात मोठी बातमी! इरणवर शोककळा, अमेरिकेचं F-35 पाडल्यानंतर काही तासांमध्येच बदला पूर्ण, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, थेट…

सर्वात मोठी बातमी! इरणवर शोककळा, अमेरिकेचं F-35 पाडल्यानंतर काही तासांमध्येच बदला पूर्ण, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, थेट…
सर्वात मोठी बातमी! इरणवर शोककळा, अमेरिकेचं F-35 पाडल्यानंतर काही तासांमध्येच बदला पूर्ण, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, थेट…


इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे, इराणने अमेरिकेचं F35 फायटर जेट उडवलं, या जेटचं वैशिष्ट म्हणजे हे फायटर जेट रडारला देखील सापडत नाही, मात्र इराणने F35 फायटर जेट उडवल्यानं अमेरिकेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मात्र त्यानंतर काही तासांमध्येच इराणला मोठा झटका बसला आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे आणखी दोन टॉप कमांडर मारले गेले आहेत. याबाबत इराणकडूनच माहिती देण्यात आली आहे. इराणने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या हल्ल्यामध्ये इस्लामिक रिव्ह्यूलेशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रवक्ता अली मोहम्मद नैनी यांचा मृत्यू झाला आहे. तर एका दुसऱ्या हल्ल्यामध्ये बासिज फोर्सच्या गुप्तचर विभागाचे जनरल इस्माइल अहमदी यांचा देखील मृत्यू झाला. हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

इस्त्रायलच्या हल्ल्यामध्ये मारले गेलेले ब्रिगेडिअर जनरल अली मोहम्मद नैनी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रवक्ता होते. तसेच ते जनसंपर्क उपप्रमुख देखील होते. त्यांना 2024 मध्ये IRGC चे कमांडर इन चीफ हुसैन सलामी यांनी या पदावर नियुक्त केलं होतं. 1957 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांना युद्धाचा प्रचंड अनुभव होता. गेल्या वर्षी इराण, इस्त्रायल युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये ते जखमी देखील झाले होते. सैन्य कारवायांची जनतेला अधिकृत माहिती देणं आणि शत्रू राष्ट्रांना इशारा देणं या कामाची जबाबदारी प्रामुख्यानं त्यांच्यावर होती.

दरम्यान दुसरीकडे इस्त्रायलने या हल्ल्यांबाबत माहिती देताना सांगितलं की, आतापर्यंत इस्त्रायलकडून इराणशी संबंधित 130 पेक्षा अधिक इंफ्रास्ट्रक्चर साइटवर हल्ला करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक हल्ले हे पश्चिम आणि मध्य इराणमध्ये करण्यात आले आहेत. दरम्यान या हल्ल्यांमध्ये बासिज फोर्सच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख जनरल इस्माइल अहमदी यांचा देखील मृत्यू झाला आहे. ते इराणच्या बुशहर प्रांतमधील रहिवासी होते. इराणच्या गुप्तचर विभागात त्यांचं मोठं योगदान होतं, मात्र इराणच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता युद्धामध्ये इराणला दोन मोठे धक्के मिळाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *