Headlines

सिलिंडर गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्यात मोठी कारवाई, तर जालनात चोरट्यांनी 110 सिलिंडर पळवले

सिलिंडर गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्यात मोठी कारवाई, तर जालनात चोरट्यांनी 110 सिलिंडर पळवले
सिलिंडर गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्यात मोठी कारवाई, तर जालनात चोरट्यांनी 110 सिलिंडर पळवले


एकीकडे इराण युद्धामुळे एलपीजी पुरवठा बाधित झाल्यानंतर काही ठिकाणी घरगुती गॅसच्या सिलिंडरचा साठेबाजार सुरु असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार ठाण्यात उपनियंत्रक शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ ठाणे यांच्या वतीने 16 मार्च 2026 रोजी घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ठाणे परिमंडळातील विविध भागांमध्ये झाडा झडती करण्यात आली.एकूण 247 ठिकाणी तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान 483 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून जप्त मालाची एकूण किंमत 30,21,222 रुपये इतकी आहे. या प्रकरणात दोन गु्न्हे दाखल होऊन 5 जणांना अटक झाली आहे. हिंगोली, गोंदिया, धुळ्यात ही कारवाई झाली असून सिलिंडर जप्त केले आहेत. तर जालनात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर लंपास झाले आहेत.

ठाण्यात गॅस काळा बाजार प्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड या भागांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्रशासनाने गॅसच्या बेकायदेशीर साठवणुकीवर आणि काळाबाजारावर कठोर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

हिंगोलीत 14 सिलिंडर जप्त

हिंगोली जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा बंद आहे.काही व्यवसायिक आपल्या व्यवसायासाठी चोरुन घरगूती सिलिंडर वापर करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने विविध ठिकाणी छापे मारत घरगुती सिलिंडरचा व्यवसायिक वापर करणाऱ्यांवर कार्यवाही करत 14 सिलिंडर जप्त केले आहेत.

गोंदियात 30 गॅस सिलिंडर जप्त

गोंदिया जिल्ह्यातही घरगुती गॅसचा काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 58 ठिकाणी धाडी टाकत हॉटेल, रेस्टॉरंटमधुन 30 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. घरगुती वापराचे सिलिंडर हॉटेल व्यावसायिक वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट असून गेल्या 4 दिवसात जिल्हा प्रशासनाने 58 धाडी टाकल्या असून 30 घरगुती सिलिंडर जप्त केले आहेत. यात एकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरासह जिल्हाभरात पुरवठा विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये 27 गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. जिल्हाभरात होत असलेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सर्वत्र व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर सध्या बंदी असल्यामुळे व्यावसायिकांतर्फे काळाबाजाराने गॅस सिलेंडर घेऊन आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्यावर आता कारवाई सुरु झाली आहे.

जालनात गॅस एजन्सीचे गोडाऊन लुटले

जालना जिल्ह्यातल्या रामनगर शहरालगत असलेल्या भारत गॅस कंपनीच्या एका एजन्सीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी जवळपास 110 सिलेंडर लंपास केल्याची घटना समोर आली. यात 96 घरगुती,12 व्यावसायिक आणि 2 प्रत्येकी 5 किलो असे एकूण 110 सिलेंडर केले लंपास झाले आहेत. याप्रकरणी गॅस एजन्सी व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला.

दरम्यान एकीकडे गॅस टंचाईचा तुटवडा निर्माण झालाय तर दुसरीकडे अशा पद्धतीने सिलेंडरची चोरी होत असल्याने हे चोरटे नेमके कोण आहेत किती आहेत त्याचबरोबर त्यांनी हे घरगुती गॅसचे सिलेंडर लंपास करून कोठे ठेवले आहेत याचा सखोल तपास करून त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता मजपुरी त्याचबरोबर जालना पोलिसांसमोर उभे राहिले.

या गॅस एजन्सीचे गोडाऊन आतापर्यंत तीन ते चार वेळा फुटल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी गॅस गोडाऊनच्या मालकाला सातत्याने सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक बसवण्यासंदर्भात सांगितलेले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या गॅस गोडाऊनचा मालक संभाजीनगरला राहायला आहे. तीन ते चार वेळा चोरी झाल्यामुळे पोलीस सुद्धा आता कसून कामाला लागले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *