Headlines

सोने स्वस्त, या 4 कारणांमुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण, थेट..

सोने स्वस्त, या 4 कारणांमुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण, थेट..
सोने स्वस्त, या 4 कारणांमुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण, थेट..


गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सतत घसरण होत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीचे भाव त्याच्या उच्चांकापेक्षा सतत घसरत आहेत. हेच नाही तर युद्धाचा परिणाम म्हणून सोने आणि चांदीचे भाव अस्थिर झाले. इराण आणि अमेरिका युद्ध आज संपण्याबद्दलची घोषणा डोनाल्ड ट्रम्प करणार असा अंदाज होता. त्यामुळे सोन्याचे भाव वधारताना दिसत होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले अधिक घातक होणार असल्याचे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. कालच्या तुलनेत MCX वर सोने आणि चांदीच्या भावात घसरण आहे. 5 मे च्या वायद्यांमधील चांदीचे दर जवळपास 13,000 रुपयांनी घसरून 2,29,888 रुपये प्रति किलो झाले. मल्‍टी कमोडिटी बाजारात सोन्याचा भाव 2,200 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,51,161 रुपयांवर आला.

जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2.15 टक्क्यांनी घसरून प्रति 4,710.95 डॉलरवर आला. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स 1500 हून अधिक अंकांनी घसरला. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका घोषणेमुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे सध्याच्या घडीला आहेत.

-डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणांमुळे त्याचा थेटपणे परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये मोठी कारवाई इराणवर करू. त्यांनी केलेल्या या विधानामुळे युद्ध भडकण्याची 100 टक्के शक्यता आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर झाला.

-फक्त सोने आणि चांदीच्या किमतीच घसरल्या नाही तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली. कालच्या तुलनेत 8 डॉलर प्रति बॅरल जास्त 160 प्रति बॅरलच्या पुढे तेलाच्या किमती गेल्या.

-डॉलर निर्देशांकात वाढ होत असून तो 100 च्या जवळ पोहोचत आहे. आजच्या घडीला डॉलर मजबूत झाला असला तरीही सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. युद्ध अधिक भीषण झाले तर सोन्याच्या किमतीमध्ये अधिक घसरण बघायला मिळू शकते.

-युद्ध अधिक भीषण होत असल्याने पुरवठा साखळीवर त्याचा थेटपणे परिणाम होत आहे. जागतिक बाजारात अस्थिरता आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोने आजच्या घडीला त्याच्या उच्चांकी दरापेक्षा 50000 च्या आसपास घसरल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *