Headlines

हार्दिक पांड्याने वसीम जाफरला आदर्श मानण्याचं कारण काय? जाणून घ्या

हार्दिक पांड्याने वसीम जाफरला आदर्श मानण्याचं कारण काय? जाणून घ्या
हार्दिक पांड्याने वसीम जाफरला आदर्श मानण्याचं कारण काय? जाणून घ्या


हार्दिक पांड्या वसीम जाफरला आदर्श मानण्याचं कारण काय? जाणून घ्याImage Credit source: PTI

टी20 वर्ल्डकप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे टीम इंडियाला जेतेपदाची चव चाखता आली. अनेक जण हार्दिक पांड्याला आदर्श मानून अष्टपैलू म्हणून क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. कारण भविष्यात क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंची सर्वाधिक गरज असणार आहे. लाखो क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आहेत. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने वसीम जाफरला आदर्श मानत क्रिकेटचे धडे गिरवले. हार्दिक पांड्याने बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात हा खुलासा केला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याचा आदर्श वसीम जाफर कसा काय असू शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं कारण म्हणजे वसीम जाफरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेल गेला. असं असताना हार्दिक पांड्या वसीम जाफरला आदर्श का मानतो ते जाणून घ्या.

वसीम जाफरला आदर्श मानतो कारण की…

वसीम जाफर हा हार्दिक पांड्याचा आवडता खेळाडू आहे. कारण लहानपणापासून हार्दिक पांड्या वसीम जाफरची बॅटिंग पाहात होता. हार्दिक पांड्याने सांगितलं की, वसीम जाफर इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा आहे. त्याच्या फलंदाजीचा क्लास वेगळा होता. त्याच्या फलंदाजीची शैली आणि तंत्र कौतुकास पात्र आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्या त्याच्या फलंदाजीच्या तंत्राची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. हार्दिक पांड्याने हा खुलासा 2022 मध्येही केला होता.हार्दिक पांड्या सचिन तेंडुलकर आणि जॅक कॅलिस यांनाही पसंत करतो. करिअरच्या सुरुवातीच्या काळात भारताचा जॅक कॅलिस व्हायचं होतं. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरीने ते खरंही केलं आहे. भारताला त्याच्यासारखा वेगवाने अष्टपैलू अद्याप मिळालेला नाही.

वसीम जाफरने क्रिकेट कारकि‍र्दीत चांगली खेळी केली. वसीम जाफर रेड बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळायचा. जाफरने 260 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले आहेत. त्याने 506.7 च्या सरासरीने 19410 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 57 शतकं आहेत. त्याने भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले आहेत. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द काही खास राहिली नाही. त्याने 34.10 च्या सरासरीने 1944 धावा केल्या. यात 5 कसोटी शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *