Headlines

हार्दीक पांड्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याचा मुलगा… नताशा हिच्याबद्दल कोणी केलं मोठं वक्तव्य?

हार्दीक पांड्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याचा मुलगा…  नताशा हिच्याबद्दल कोणी केलं मोठं वक्तव्य?
हार्दीक पांड्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याचा मुलगा…  नताशा हिच्याबद्दल कोणी केलं मोठं वक्तव्य?


Natasa Stankovic Hardik Pandya: भारतीय क्रिकेट विश्वाचा स्टार खेळाडू हार्दीक पांड्या याची पूर्व पत्नी नताशा हिचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. माहिका शर्मा बॉयफ्रेंड हार्दीक याच्या मुलासोबत मॅच पाहण्यासाठी पोहोचली होती. हार्दीक मैदानावर दमदार खेळत असताना माहिका आणि अगस्त्य त्याला चीअर करत होते. त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नताशा हिचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेत्री माही विज हिने देखील नताशा हिचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माही हिने नकाशा हिचं कौतकु केलं आहे.

माही विजने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे ज्यामध्ये हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्य स्टेडियमच्या स्टँडमध्ये बसून हार्दिक पंड्या आणि गर्लफ्रेंड महिका शर्मा यांच्यासोबत असल्याचं दिसत आहे.

व्हिडीओ पोस्ट करत माही म्हणाली, ‘हे जग किती सुंदर आहे… जेथे एका मुलाला तिरस्कार नाही तर, प्रेम करण्यास शिकवलं जात आहे… नताशा एक आई म्हणून तू खूप चांगलं काम करत आहेस…’, व्हिडिओमध्ये, महिका शर्मा स्टँडमध्ये बसलेली दिसत आहे. तिच्यासोबत लहान अगस्त्य आहे, जो त्याचे वडील हार्दिक पांड्या यांना मैदानावर क्रिकेट खेळताना पाहून खूप आनंदी दिसत आहे.

माही विज पुन्हा व्हिडिओ शेअर करत म्हणाली, अनावश्यक नाटक आणि ताणतणावाऐवजी मुलाचे संगोपन ज्या सकारात्मक वातावरणात होत आहे त्याचं कौतुक आहे. तिने मुलामध्ये रुजवलंल्या प्रेम आणि दयाळूपणाच्या मूल्यांचे कौतुक… असं देखील माही म्हणाली.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टैनकोविक यांचा घटस्फोट

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टैनकोविक यांचा घटस्फोट झाला आहे… खासगी मतभेद असले तरी, दोघे मुलासाठी कायम एकत्र येतात आणि त्याचा सांभाळ करतात… नुकताच, हार्दिक याने मुलाला 30 कोटी रुपयांची कार भेट म्हणून दिली….

माही विज हिचा देखील झालाय घटस्फोट…

माही हिने अभिनेता जय भानुशाली याच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 10 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… माही आणि जय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली… पण घटस्फोटानंतर देखील दोघे मिळून लेक तारा हिचा सांभाळ करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *