Headlines

30 वर्षांपासून अजितदादांना दिली मनापासून साथ, आता त्यांच्यानंतर तोच विश्वासू सहकारी पक्ष सोडणार का?

30 वर्षांपासून अजितदादांना दिली मनापासून साथ, आता त्यांच्यानंतर तोच विश्वासू सहकारी पक्ष सोडणार का?
30 वर्षांपासून अजितदादांना दिली मनापासून साथ, आता त्यांच्यानंतर तोच विश्वासू सहकारी पक्ष सोडणार का?


सध्या कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीयत. पण अजितदादा पवार यांचा एक जुना सहकारी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या आहेत. सध्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. अजित पवार यांचं अकाली विमान अपघातात निधन झालं. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षाने ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकी दरम्यानच अजित दादांचा एक जुना सहकारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.

पुणे जिल्ह्यातील राजकारणात सध्या या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्वतःबाबत पसरत असलेल्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. या सर्व बातम्या त्यांनी ठामपणे फेटाळून लावल्या आहेत. “मी भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली, पण ती पूर्णपणे खोटी आहे. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी गेलो असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केवळ भेट झाली, मात्र कोणतीही बंद दाराआड चर्चा झालेली नाही” असं त्यांनी स्पष्ट केलं.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनाही नकार

“गेल्या 30 वर्षांपासून मी अजित पवार यांच्या सोबत काम करत आहे. आता अजित पवारांच्या निधनानंतर अशा परिस्थितीत पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावर अशी वेळ आलेली नाही की दुसऱ्या पक्षात जावं” असं दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनाही नकार दिला. “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्येच आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन काही वेगळं घडेल, असं मला वाटत नाही” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. दरम्यान बारामती निवडणुकी मध्ये “ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घ्यावी. अजित दादांप्रती खरी भावना असेल, तर सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून द्यावं” असं आवाहन त्यांनी केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *