
टीव्ही विश्वातील जगात अनेक असे किस्से दडलेले आहेत, जे समोर आल्यानंतर अंगावर काटा येते… असाच एक भयानक प्रकार घडलेला जेव्हा एका मोठ्या मालिकेचं शुटिंग सुरु होतं… सेटवर सर्वकाही सुरुळीत सुरुॉ होतं. लोक त्यांच्या कामात व्यस्त होते… पण कोणालाच माहिती नव्हतं की, पुढच्या काही क्षणात सर्वकाही बदलणार आहे. सेटवर अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांची पळापळ सुरु झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक सर्वत्र पळू लागले… भीतीमुळे लोकांच्या ओरडण्याच्या आवाजाने तर वातावरण भयानक झालं होतं… या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती…
सांगायचं झालं तर, सेटवर आजच्या काळात ज्या सुविधा होत्या त्या पूर्वी फार मर्यादित होत्या. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं… आगीवर नियंत्रण मिळवणं देखील कठीण झालं होतं. अडकलेल्या लोकांना बाहेर निघण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता, ज्यामुळे अनेकांनी स्वतःचे प्राण गमावले…
या घटनेनंतर सर्वांना धक्का बसला. इंडस्ट्रीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे सेटवरील सुरक्षेच्या महत्त्वावर विचार करण्यास सर्वांना भाग पडले. सध्या ज्या मालिकेची चर्चा होत आहे, ती मालिका दुसरी तिसरी कोणती नाही तर, ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ मालिका होती. मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
25 फेब्रुवारी 1990 ते 14 एप्रिल 1991 पर्यंत मालिका दुरदर्शनवर प्रसारित होत होती. पण मालिकेची ओळख केवळ कथेपुरती मर्यादित नव्हती. चित्रीकरणादरम्यान झालेल्या एका भीषण अपघाताने ती मालिका कायमची अविस्मरणीय बनवली. या मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते आणि मुख्य अभिनेते संजय खान होते, ज्यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या दिवशी, म्हैसूरमधील प्रीमियर स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू असताना सेटवर अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण सेट जळून गेला. या घटनेत जवळपास 52 लोकांचा मृत्यू झाला. संजय खान हे देखील आगीत गंभीररित्या भाजले, त्यांचं सुमारे 65 टक्के शरीर भाजलं होतं. आजही ही घटना टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जाते.
या धक्कादायक घटनेबद्दल मालिकेत काम करणाऱ्या अनंत महादेवन यांनी मोठा खुलासा केलेला. एका मुलाखतीत ते म्हणालेले, ‘त्या दिवशी मला सतत असं वाटत होत की, काही तरी वाईट होणार आहे. या घटनेनंतर सर्वांमध्ये भीतीचं वातावरण होतं… जे आगीतून बचावले त्यांनी त्यांच्या घरी फोन करून जिवंत असल्याचं सांगितल…’ असं अभिनेते म्हणाले होते.