Rohit Pawar : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जाहिरात झळकली. काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करतानाता दिसत होते. तर काही वृत्तपत्रातीत ते गणपती बाप्पाला नमस्कार करतानाचा फोटो होता. या जाहिरातीमध्ये फोटो खेरीज फक्त मजकूर स्वरुपात ‘देवाभाऊ’ इतकच लिहिलं होतं. त्यामुळं ही जाहिरातबाजी नेमकी कोणी केली? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
तुम्ही रोज 40 कोटी ऐवजी 400 किंवा 4000 कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे असे रोहित पवार म्हणाले. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे.
ज्या कंपनीचा 90 कोटींचा दंड माफ केला त्या कंपनीने जाहिरात दिली का?
या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? असा सवाल त्यांनी केला. उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? असा सवाल रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे. या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर असे रोहित पवार म्हणाले. ही जाहिरात सरकारनी दिली की? खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली, की फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांनी अथवा भाजपाच्या कोणत्या आमदाराने केली. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
Rohit Pawar on Pune Crime : ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ कुठे आहेत? पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुण्यात रक्तरंजित होळी; रोहित पवार संतापले
आणखी वाचा