Headlines

5 महिन्याआधीच मेलेल्या मुलीच्या डेडबॉडीसोबत राहत होता बाप; दुर्गंधी घालवण्यासाठी जे केलं, ते वाचून बसेल धक्का!

5 महिन्याआधीच मेलेल्या मुलीच्या डेडबॉडीसोबत राहत होता बाप; दुर्गंधी घालवण्यासाठी जे केलं, ते वाचून बसेल धक्का!
5 महिन्याआधीच मेलेल्या मुलीच्या डेडबॉडीसोबत राहत होता बाप; दुर्गंधी घालवण्यासाठी जे केलं, ते वाचून बसेल धक्का!


एक घर… बंद खोली आणि खोली मुलीचा सडलेला मृतदेह… ऐकायलाच प्रचंड रहस्यमय वाटत आहे… पण कोणालाच माहिती नव्हतं की, घरात नेमकं काय सुरु आहे आणि काय घडलेलं आहे… एका बाप तब्बल पाच महिने मुलीच्या सडलेल्या मृतदेहासोबत राहत होता. पण आपल्या शेजरी राहत असलेल्या व्यक्ती मुलीच्या मृतदेहासोबत राहत आहे. हे शेजारच्यांना माहिती नव्हतं… शेजारी कायम व्यक्तीला विचारायचे की, तुमची लेक प्रियंका कुठे आहे… तेव्हा बाप सांगायचा डेहराडून येथए राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मृतदेहाचा पूर्णपणे सांगाडा झालेला… बॉडी पूर्णपणे सडलेली होती फक्त पाय राहिलेले होते…

5 महिने घरात लपवलेला लेकीचा मृतदेह

नातेवाईक जेव्हा व्यक्तीच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना दुर्गंधी येऊ लागली. अशात त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. पोलीस घटना स्थळी पोहोचले आणि खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा सडलेला मृतदेह पाहून सर्वच थक्क झाले. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की, कोणी पाहू देखील शकत नव्हतं… ही धक्कादायक घटना मेरठ येथील तेली परिसरात घडली आहे.

दुर्गंधी घालवण्यासाठी फवारायचा परफ्यूम

संबंधित घर मूळचे बंगालचे असलेल्या उदय भानू बिस्वास यांचं आहे. पाच महिने जुना कुजलेला मृतदेह उदय भानू यांची लेक आणि शिक्षिका प्रियांका हिचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा पाच महिन्यांपूर्वी काविळीने मृत्यू झाला होता. मात्र, आपल्या मुलीसोबत राहण्याचा दृढनिश्चय असल्याने वडिलांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. त्यांनी मृतदेह घरातच ठेवला आणि ते काही दिवसांसाठी डेहराडूनला गेले. जेव्हा नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सांगितले की ते डेहराडूनला काम करतात आणि त्यांची मुलगी तेथील रुग्णालयात दाखल आहे.

जेव्हा उदयभानूची त्याच्या घरी कसून चौकशी केली गेली, तेव्हा त्याने सत्य कबूल केलं. जेव्हा त्याने सांगितलं की त्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तिचा मृतदेह घरातच आहे, तेव्हा नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. जेव्हा पोलीस आले आणि खोलीत शिरले, तेव्हा खोलीची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. खोली कचऱ्याने भरलेली होती आणि मुलीचा कुजलेला मृतदेह पलंगावर पडलेला होता. पोलिसांनी वडिलांना अटक केली आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, काविळमुळे व्यक्तीच्या लेकीचं निधन झालं. बाप तब्बल 2 महिने मृतदेहासोबत राहिला आणि दुर्गंधी घालवण्यासीठ परफ्यूमचा वापर करायचा… त्यानंतर तो डेहराडूनला गेला. तो काही दिवसांपूर्वीच घरी परतला. तोपर्यंत मृतदेह अर्ध्याहून अधिक कुजला होता. पण तरीही त्याने याबद्दल कोणालाही सांगितलं नाही आणि तो त्या मृतदेहासोबतच जगत राहिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे 2013 मध्ये त्याच्या बायकोने स्वतःला संपवलं होतं. त्यामुळे तो अधिक तणावाखाली होता. आता पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *