
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मिस्ट्री आणि थ्रिलर चित्रपट आले पण सुमारे 60 वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाने प्रेक्षकांवर अशी छाप पाडली की आजही त्याची चर्चा होते. हा चित्रपट म्हणजे 1964 साली प्रदर्शित झालेला 'वो कौन थी?'
या चित्रपटाची कथा, संगीत आणि रहस्यमय वातावरण इतके प्रभावी आहे की 62 वर्षांनंतरही तो तितकाच रोमांचक वाटतो. विशेष म्हणजे या चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका जबरदस्त होता की चित्रपट शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय प्रेक्षकांना समाधान मिळत नाही.
चित्रपटाची कथा, वातावरण आणि अभिनय यामुळे तो त्या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक ठरला. माहितीनुसार, या चित्रपटाचा बजेट सुमारे 20 लाख रुपयांच्या आसपास होता.
मात्र रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. त्या काळात ही खूप मोठी रक्कम मानली जात होती. त्यामुळे हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.
आजही 'वो कौन थी?' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. IMDb वर या चित्रपटाला 7.5 रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट आजही YouTube वर मोफत पाहता येतो.