Headlines

’80 टक्के पाकिस्तानी गे, बाकी 20 टक्के बायसेक्शुअल’, पाकिस्तानी ट्रांसजेंडरकडून मोठं सिक्रेट ओपन, Video व्हायरल

’80 टक्के पाकिस्तानी गे, बाकी 20 टक्के बायसेक्शुअल’, पाकिस्तानी ट्रांसजेंडरकडून मोठं सिक्रेट ओपन, Video व्हायरल
’80 टक्के पाकिस्तानी गे, बाकी 20 टक्के बायसेक्शुअल’, पाकिस्तानी ट्रांसजेंडरकडून मोठं सिक्रेट ओपन, Video व्हायरल


पाकिस्तान अनेक समस्यांचा सामना करत असताना, देशाचं एक मोठं सिक्रेट समोर आलं आहे. पाकिस्तानातील 80 टक्के लोक गे असून उरलेले 20 टक्के लोक बायसेक्शुअल आहेत… हा मोठा खुलासा पाकिस्तानातील ट्रान्सजेंडर कार्यकर्ती हिना बलोच यांनी केला आहे. हिना यांच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हिने यांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तानातील कोणतीच व्यक्ती स्ट्रेट नाही. सध्या हिना यांचा एक छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पाकिस्तानी नागरिकांच्या लैंगिकतेबद्दल बोलताना दिसत आहेत.

पाकिस्तानचं सिक्रेट ओपन…

हिना बलोच यांच्या दाव्यानंतर पाकिस्तानचं मोठं रहस्य जगासमोर आलं आहे. हिना यांनी केलेल्या दाव्यानुसार, समाज, धर्म आणि कौटुंबीक दबावामुळं येथील नागरिक आपली मूळ ओळख लपवतात. सर्वांसमोर कोणताच नागरिक याविषयावर बोलच नाही. पण त्याठिकाणी ही गोष्ट सामान्य आहे.

कोण आहे हिना बलोच?

हिना बलोच पाकिस्तानातील कराची येथील आहेत. त्या स्वत:ला ‘ख्वाजा सीरा’ म्हणवतात, जी पाकिस्तानमध्ये कायदेशीर मान्यताप्राप्त तृतीय लिंग आहे. यासाठी हिना यांना लहानपणापासून मोठा संघर्ष करावा लागला. हिना सांगतात, माझ्यासाठी सर्वांत मोठी चिंता होती लिपस्टिक लावणं… मुलींसारखे कपडे आणि दागिने घालणं… कारण मी असं केल्यानंतर माझे कुटुंबिय मला मारायचे…

सांगायचं झालं तर, ख्वाजा सीरा म्हणजे तृतीयपंती समुदायातील लोक भीक मागणे, नाचने किंवा वेश्या व्यवसायापर्यंत मर्यादित होते. पण हिना यांनी यासर्व प्रथांना पाठ दाखवली आणि स्वतःच्या अधिकारांसाठी काम करत राहिल्या. सर्वात आधी तर, प्राइड फ्लॅग फडकवल्यामुळे हिना हिंसाचाराच्या बळी ठरल्या.

एवढंच नाही तर, पोलिसांकडून अपहरण आणि अत्याचार झाल्यानंतर त्यांना पाकिस्तान सोडण्यात भाग पाडण्यात आलं. आता हिना यूकेमध्ये राहतात, जिथे त्यांनी लंडन विद्यापीठाच्या SOAS मध्ये शिक्षण घेतलं आणि निर्वासित दर्जा मिळाला आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

हिना यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा हिना बलोच यांचा वैयक्तिक दावा आहे. याबद्दल कोणतंही संशोधन करण्यात आलेलं नाही… त्यामुळे हिना यांनी सांगितेले आकडे किती सत्य आहेत, याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही… अशा वक्तव्यांमुळे फक्त वाद टोकाला पोहोचतात.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *