
Mumbai Crime News : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून अतिशय धक्कादायक आणि पितृत्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. यात पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने एका व्यक्तीने चक्क आपल्या 4 वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केली आहे. चार वर्षांची चिमुरडी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून ही हत्या (Mumbai Crime) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा (Crime) उलगडा झाला असून वरळीवरून आरोपी इमरान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
गळा आवळून हत्या, मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला
पुढे आलेल्या माहितीनुसार, चार वर्षांची चिमुरडी रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असयाची. परिणामी इमरान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत होती. दरम्यान, हाच राग मनात ठेवून इमराने अतिशय क्रूरपणे चार वर्षांची चिमुरडीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर हे कृत्य कुणाला कळू नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू करत चौकशी केली असता पोलिसांना संशय आला. त्यातच मुलगी बेपत्ता झाल्यापासून पिता इमरान शेख बेपत्ता झाल्याने हा संशय अधिक बळावला. अखेर पोलीस तपासात सत्य बाहेर आलं आणि अँटॉप हिल पोलिसांनी वरळीवरून इमरान शेखला अटक करत बेड्या ठोकल्या आहे.
गेटवे ऑफ इंडिया जवळील प्रवासी जेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल
गेटवे ऑफ इंडिया जवळील प्रवासी जेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे. स्थानिक रहिवासी संघटनांनी जेट्टीच्या बांधकामविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जेट्टी ही लोकोपयोगी असल्याने त्याला विरोध करणं योग्य नाही, असे उच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी 1 जुलैला सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. तर स्थानिक रहिवासी संघटनांना विश्वासात न घेता प्रकल्प लादल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रस्तावित जेट्टी ही हेरिटेज 1 श्रेणीतील गेट वे ऑफ इंडियाच्या 100 मीटर परिघात असल्याने त्याला वाचवणे गरजेचे असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला होता. तसेच प्रस्तावित जेट्टीकडे जाणारे अरुंद रस्ते त्यामुळे तिथे होऊ शकणारी वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांच्या समस्या याकडे देखील याचिकेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा