Headlines

Pratap Sarnaik On Tesla Car: देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार; महाराष्ट्रातील मंत्र्याचा निर्धार

Pratap Sarnaik On Tesla Car: देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार; महाराष्ट्रातील मंत्र्याचा निर्धार
Pratap Sarnaik On Tesla Car: देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार; महाराष्ट्रातील मंत्र्याचा निर्धार


Pratap Sarnaik On Tesla Car मुंबई: देशात प्रथमच टेस्ला (Tesla) कार काल (15 जुलै) दिमाखात दाखल झाली. त्यानंतर आज (16 जुलै) देशातली पहिली टेस्ला गाडी विधानभवनात (Maharashtra Vidhansabha) दाखल झाली. काल टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक ही गाडी विधानभवनात घेऊन आले. विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली. यावेळी टेस्ला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. तसेच देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याची तयारी देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दर्शवली. 

देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याची तयारी आणि इच्छा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी पहिली कार घेणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच टेस्लाची गाडी कधीपासून बुकिंग करता येईल?, असा प्रश्न प्रताप सरनाईकांना विचारण्यात आला. यावर आता फक्त शोरूम लॉन्च केलं आहे. लवकरच बाकीच्या प्रक्रिया पूर्ण करून टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू केली जाईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. मुंबईतील टेस्लाचे सेंटर केवळ एक्सपीरियन्स सेंटर न राहता, डिलिव्हरी लोकेशन, लॉजिस्टिक सेंटर आणि सर्विसिंग युनिट देखील येथे सुरु करण्यात आले आहे. टेस्लाच्या कार्सचे बुकिंगही याठिकाणी सुरु झाले आहे. टेस्लाचे जगप्रसिद्ध मॉडेल “Model Y” आज भारतात लाँच करण्यात आले असून, या कारला १५ मिनिटांत चार्ज करता येते आणि ती एकदा चार्ज केल्यानंतर 600 किमी धावू शकते. ही कार शून्य प्रदूषण करणारी असून, तिचे सेफ्टी फीचर्स जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जातात, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबईत चार मोठे चार्जिंग हब-

राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहनासाठी अत्यंत डायनॅमिक पॉलिसी राबवली आहे. यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कर सवलती व मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योगात देशात आघाडीवर असेल. तसेच मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून, मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि 32 चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातमी:

Tesla Y Model Car price : 5 सेकंदात 100 चा टॉप स्पीड, एका चार्जिंगमध्ये 500 किमी प्रवास, टेस्लाच्या Y मॉडेलची किंमत किती?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *