मुंबईत Tesla कारच्या पहिल्या शोरूमचं उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी Tesla कार विधानभवनात दाखल झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या गाडीची Test Drive घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांना Tesla कार चालवताना पाहण्यासाठी विधान भवन परिसरात मोठी गर्दी झाली होती. Test Drive नंतर गाडीबद्दल बोलताना, “गाडी एकदम स्मूथ आहे, चांगली आहे आणि बिलकुल तिचा आवाज येत नाही. अतिशय स्मूथ राइडलं आहे आणि खूप प्रदूषणरहित पॉल्युशंटफ्री गाडी आहे,” असे सांगण्यात आले. राज्य सरकारने Electric Vehicle (EV) धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. राज्य शासनाच्या गाड्यांनाही Electric मध्ये रूपांतरित केले जात आहे. त्याचबरोबर ST बसेस आणि BEST बसेस देखील Electric Vehicle मध्ये बदलल्या जात आहेत. यामुळे वाहतूक क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत.