ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत या सात धरणांमध्ये मिळून ऐंशी पूर्णांक बत्तीस टक्के पाणीसाठा होता. मोडकसागर, उर्ध्व वैतरणा आणि मध्य वैतरणा या धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. या धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. धरणांमधील पाणीसाठा खालीलप्रमाणे आहे: मोडकसागर शंभर टक्के, तानसा एकोणनव्वद पूर्णांक एकोणीस टक्के, मध्य वैतरणा ब्याण्णव पूर्णांक शून्य सहा टक्के, भातसा चौर्याहत्तर पूर्णांक अठरा टक्के, विहार बावन्न पूर्णांक अठरा टक्के, तुळशी बावन्न पूर्णांक त्र्याहत्तर टक्के.
Source link
New Thinking, New Style, Super Coverage