Headlines

Suresh Dhas on Agriculture Scam: स्कायमेटकडून हप्ता, 20 वर्षे कृषी विभागात ठाण, विमा कंपन्यांना मदत करणारा विनय आवटे कोण? सुरेश धसांचा गंभीर आरोप

Suresh Dhas on Agriculture Scam: स्कायमेटकडून हप्ता, 20 वर्षे कृषी विभागात ठाण, विमा कंपन्यांना मदत करणारा विनय आवटे कोण? सुरेश धसांचा गंभीर आरोप
Suresh Dhas on Agriculture Scam: स्कायमेटकडून हप्ता, 20 वर्षे कृषी विभागात ठाण, विमा कंपन्यांना मदत करणारा विनय आवटे कोण? सुरेश धसांचा गंभीर आरोप


Suresh Dhas: पंतप्रधान पीक विमा योजनेत कृषी आयुक्तालयातील अधिकारी  व विमा कंपन्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप मदार आमदार सुरेश धस यांनी पावसाळी अधिवेशनात केलाय. पीक घोटाळ्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. विनय आवटे  नावाच्या व्यक्तीने खाजगी गुंतवणुकीतून व्याज कमावले, मात्र शेतकऱ्यांना विमा दिला नाही. कृषी आयुक्तालयातील आणि कृषी सचिव कार्यालयातील काही अधिकारी विनय आवटेला मदत करत असल्याचा आरोप करण्यात आलाय.यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत. 

काय म्हणाले सुरेश धस?

आवटे हा कृषी मंत्रालयात मागील 20 वर्षांपासून फिरतोय खासगी कंपन्यांना लाभ कसा होईल? विमा कसा शेतकऱ्यांना मिळणार नाही असे कृषी अधिकारी वागत असेल.स्कायमेटची यंत्रणा उभी करत त्यांच्याकडून हफ्ते घेत हे होत असेल तर चुकीचं आहे. असं आमदार सुरेश धस म्हणाले. यासंदर्भात चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. विनय आवटेनं शेअरमध्ये विमा कंपन्यांनी गुंतवणूक केली. विनय आवटे यांनी चुकीचे काम केले.आवटेंवर 302 देखील लागू शकतं, शेतकऱ्यांना विमे मिळाले नाही. कोणतेही कृषी आयुक्त आले तरी त्यांनाच चार्ज .मग त्यात मंत्री देखील आले .१ रुपयात विमा कोणाच्या काळात आला… कोण मंत्री होता मी नाव घेणार नाही.२०२१ नंतर तुम्ही बघा असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

कृषीमंत्र्यांच्या लोकांनी पैसे भरले…धसांचा आरोप

गावरान जमिनीवर वनखात्याच्या जमिनीवर देखील पिक विमा भरले बीडमधल्या ११ तालुक्यात भरले .वर्धा, नागपूर अमरावती, जालन्यात देखील आमच्याच म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी पैसे भरले.धनंजय मुंडे म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री यांच्या केलेल्या घोटाळ्याच्या चौकशी सुरु झाली आहे.

कोण आहे विनय आवटे?

पावसाळी अधिवेशनात पीक विमा घोटाळ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विनय आवटे नावाच्या व्यक्तीने खाजगी गुंतवणुकीतून व्याज कमावले, मात्र शेतकऱ्यांना विमा दिला नाही. कृषी आयुक्तालयातील आणि कृषी सचिव कार्यालयातील काही अधिकारी विनय आवटेला मदत करत असल्याचा आरोप आहे. एक व्यक्ती २० वर्षे पीक विम्याचे वाटोळे कसे करू शकते, असा प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. विनय आवटे मुख्य सांख्यिकी पदावर असून, इतर पदांवरही कार्यरत आहेत. एक रुपयात पीक विमा योजना ज्या कृषी मंत्र्यांच्या काळात आली, त्यांच्यापासून विनय आवटेपर्यंत सर्वांचे लागेबांधे असल्याचा दावा करण्यात आला. खोटे शेतकरी आणि सरकारी, गायरान, वन खात्याच्या जमिनींवरही पीक विमे भरले गेल्याचे आढळले. तत्कालीन कृषी मंत्री धर्मेंद्र मुंडे यांच्यावरही आरोप आहेत. कृषी निविष्ठा, नॅनो युरिया, सोयाबीन आणि कापूस घोटाळ्याची तक्रार केल्यानंतर विनय आवटेलाच चौकशी प्रमुख केल्याचा आरोप आहे.

कापसाच्या बंडीतील घोटाळा, नॅनो युरीया घोटाळा प्रकरणात आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्यांच्या काळात मोठा घोटाळा झाला आहे .अब्दुल सत्तार यांच्या काळात तेवढा नाही ना आताच्या काळात आहे .मी तर म्हणेल आकाच हे सर्व चालवत होता. असा आरोपही आमदार सुरेश धस यांनी केलाय.

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *