
Shambhuraj Desai : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांच्यासह मंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही सभागृहाचं काम संपल्यानंतर भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत असंसदिय शब्द वापरलेत त्याचा निषेध केला. भास्कर जाधव यापूर्वी आदित्य ठाकरेंबाबत काय बोलले त्याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवू इच्छित असल्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. आशिष जैयस्वाल यांनीही यावेळी भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केलेला व्हिडिओ दाखवला. जे भास्कर जाधव आता निष्ठावान असल्याचा आव आणत आहेत ते पाहा असे जयस्वाल म्हणाले.
मातोश्रीवर एक मासा पाळला होता. त्यावेळी भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते. वातावरण दुखी असल्याने भास्कर जाधव यांना बाहेर काढल्याचे शंभूराज देसाआ म्हणाले. मासा आत तडपडून मेला, मात्र भास्कर जाधव बाहेर तडपतड आहेत. आमच्याकडेही सांगणयासारखं भरपूर काही आहे, भास्कर जाधवांना हे ओळखावं असे देसाई म्हणाले. यापुढं शिवसेना स्टाईलनं जशास तसं उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या नेत्याबाबतही काही गोष्टी एकूण घेणार नाही असेही शंभूराज देसाई म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपद मिळवणयासाठी भास्कर जाधवांचा खाटाटोप
मंत्री योगेश कदम यांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेतेपद मिळवणयासाठी हा खटाटोप करत आहेत. या आधी बाळासाहेबांना सोडून गेले, नंतर पवार साहेबांना सोडून गेले. आदीत्य ठाकरे यांचा मांजरीचा आवाज काढून थट्टा करणारे हेच भास्कर जाधव होते. हे आदित्यजींना चालतं का? असा सवाल यावेळी योगेश कदम यांनी केला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला देखील योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. नाना पटोले यांच्याकडे पुरावे होते तर देत का नाहीत? असा सवाल त्यांनी केला. सरकारची बदनामी करण्यासाठी हे केलं जात आहे. 3 आठवड्यात एका गोष्टीवर आरोप करता आला नाही. म्हणून असे आरोप करुन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कदम म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते भास्कर जाधव?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आज (17 जुलै) विधानसभा अधिवेशनामध्ये सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये (राज्याच्या विविध समस्या अंतर्भूत करून समस्या माडंलेल्या असतात आणि संबंधित मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत असे संकेत आहेत) बोलताना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघाती प्रहार केला. यावेळी भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पावित्र्यामध्ये राहुल नार्वेकरांचे संभावना दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका सुद्धा केली. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वत: उत्तरे द्यावीत, असा टोला सुद्धा लगावला. अध्यक्ष स्वतःला ज्ञानी समजतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.
2014 पासून एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री असल्याचे सांगत मुंबईमध्ये होणाऱ्या विकासकामांवरून मेहरबानी करत नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले. सातत्याने ठाकरेंवर टीका करायला लाज वाटत नाही का? अशी विचारणा केली.आम्हाला एरवी शिका म्हणणारे अध्यक्ष दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशा स्थितीत आहेत. उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत. मात्र अनेक लोकांच्या विषयाला हात न घालता उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केल्याचा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला. खिचडी घोटाळ्याचा उल्लेख सुद्धा भास्कर जाधव यांनी करत एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच प्रहार केला.
महत्वाच्या बातम्या:
Bhaskar Jadhav: दुतोंडी अध्यक्ष बोलतात एक करतात दुसरं, उठसूट ठाकरेंवर टीका करायला एकनाथ शिंदेंना लाज वाटत नाही का? सभागृहात ‘बंदी’ करताच भास्कर जाधवांचा हल्लाबोल
आणखी वाचा