Headlines

मला अतीव दुःख आहे, विधानभवन राड्यानंतर पडळकरांकडून दिलगिरी; जितेंद्र आव्हाडांकडून संताप

मला अतीव दुःख आहे, विधानभवन राड्यानंतर पडळकरांकडून दिलगिरी; जितेंद्र आव्हाडांकडून संताप
मला अतीव दुःख आहे, विधानभवन राड्यानंतर पडळकरांकडून दिलगिरी; जितेंद्र आव्हाडांकडून संताप


मुंबई : विधानभवन परिसरात घडलेल्या राड्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांना महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावून घेतले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही आमदारांना एकत्र बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आमदारांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे, सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त  करतो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. पडळकर यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले, तसेच माझ्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी अधिक प्रतिक्रिया देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नेमकं काय घडलं?

विधानभवनाच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते हृषिकेश टकले आणि आमदार जितेंद्र आव्हाडांचे मुख्य कार्यकर्ते नितिन देशमुख यांच्यात तूफान हाणामारी झाली. गंभीर गोष्ट अशी की स्वतः आमदार गोपिचंद पडळकर तिथे उपस्थित होते. यादरम्यान विधानसभेत जितेंद्र आव्हाड काल विधिमंडळाच्या दारावर झालेल्या शिवीगाळ बद्दल बोलत होते. या घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी घडलेल्या घटनेची माहिती विधानसभेत दिली. हाच सगळा प्रकार सना मलिक यांनीही विधानसभेत सांगितला आणि त्यामुळे आपण बाहेर जात असताना, पुन्हा सभागृहात परतल्याचं त्यांनी म्हटलं. यादरम्यान जितेंद्र आव्हाड बाहेर आले आणि मिडिया स्टँडवर त्यांनी माध्यमांना बाईट दिला. याचवेळी विधीमंडळात आशिष शेलारांनी सगळी घटना सविस्तर सांगितली. त्यावर अध्यक्षांनी रिपोर्ट मागवला आहे. जितेंद्र आव्हाड आत येऊन पुन्हा चिडून बोलले, त्यावर अध्यक्षांनी पुन्हा एकदा रिपोर्ट मागितला. हे सगळं होत असताना गोपीचंद पडळकरांनी विधिमंडळ परिसरातून काढता पाय घेतला होता. 

पडळकरांनी मागितली माफी

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी पडळकरांना बोलावून घेतले. दरम्यान दोघांनाही सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आणि दोघांचेही जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर जयंत पाटील अणि जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांना सगळ्या घटनेची माहिती दिली. हे सगळं घडत असताना पडळकर विधिमंडळात परतले आणि बावनकुळेंना भेटायला गेलेय. गोपीचंद पडळकर आणि चंद्रशेखऱ बावनकुळे यांची बैठक 10 मिनिटांत संपली आणि पडळकरांनी बाहेर येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि विधीमंडळातून ते निघून गेले

जितेंद्र आव्हाडांकडून संताप व्यक्त

विधानसभेत जर तुम्ही गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे जीव सुरक्षित नाहीत. मला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर अजून काय काय लिहिलं आहे. भाषण करुन बाहेर आलो होतो, मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर गेलो होतो. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते.विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, भवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच, काय गुन्हा आहे आमचा, कुणीतरी मवाल्यासारखा येतो, आई बहिणींवरुन शिव्या देतो, त्याला पार्लमेंटरी शब्द करुन टाका, अनपार्लमेंटरी शब्द वापरतात, ते पार्लमेंटरी करुन टाका, सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज असे म्हणत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा

विधानभवन लॉबीतच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा संताप; गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *