
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट (Cinema) दोन वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. अभिनेता विवेक ओबेरायने या चित्रपटात नरेंद मोदींनी भूमिका साकारली होती, पंतप्रधानाच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संपूर्ण प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला. आता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. मात्र, काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत हा चित्रपट अडल्याचं पाहायला मिळालं. आता, लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडे (Court) सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्याबाबत 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, प्रमाणपत्र मिळाल्यास 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ शकतो.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासंदर्भाने दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे, लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी, दाखल याचिकेतील सुनावणीत सेन्सॉर बोर्डाने पुढील 2 दिवसांत निर्णय घेऊ असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असून सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारीत ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी महिन्याभरापूर्वी प्रमाणपत्रासाठी अर्ज करून देखील कालमर्यादेत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे, हायकोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं. सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्यानंतर निर्मात्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी, सेंटर बोर्डाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र मागितल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आला होता. त्यामुळे, याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं. त्यानंतर, 2 दिवसांत प्रमाणपत्र देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय घेऊ, असे सेन्सॉर बोर्डाने न्यायालयापुढे सांगितले.
#Bombay High Court issues notice to CBFC in a petition alleging arbitrary delay in certifying the film ‘Ajey: The Untold Story of a Yogi’ , inspired by the book ‘The Monk Who Became Chief Minister’ purportedly based on UP CM Yogi Adityanath’s life.#BombayHC… pic.twitter.com/bbMmhHcgic
— Bar and Bench (@barandbench) July 15, 2025
‘बॉम्बे हाय कोर्टाने चित्रपटाला मान्यता मिळण्यात मनमानी करत विलंब केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाला नोटीस बजावली आहे. ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा आहे. तसेच हा सिनेमा द माँक हू बिकम चीफ मिनिस्टर या पुस्तकावर आधारित आहे’ असे म्हणत बार अँड बेंच ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा
मला अतीव दुःख आहे, विधानभवन राड्यानंतर पडळकरांकडून दिलगिरी; जितेंद्र आव्हाडांकडून संताप
आणखी वाचा