Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर…

विधानभवनात हायव्होल्टेज ड्रामा, जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यासाठी पोलिसांची गाडी अडवली, गाडीखाली झोपले, पोलिसांनी फरफटत बाहेर ओढलं

महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केलं. सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं. अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं. आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवारही उपस्थित होते. मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केलाय. दरम्यान काल रात्री उशिरा नितीन देशमुखला पोलीस घेऊन गेले मात्र कोणत्या पोलीस स्टेटशनला घेऊन गेले हे कळू शकलं नाही तर दुसरा आरोपी हृषीकेश टकले याची सेंट जॉर्ज रुग्णालयात रात्री 3 वाजता मेडिकल चाचणी करण्यात आलीये.

विधानभवनाच्या लॉबीत पडळकरांच्या कार्यकर्त्याची मग्रुरी, आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर गुंडासारखा धावला, हात टाकला

महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल असा आणखी एक प्रकार आज घडला.. तो सुद्धा विधानभवनात.. सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या दारात काल शिविगाळ केली-धमक्या दिल्या. त्यांचे समर्थक वरताण निघाले, त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी केली.

राड्यानंतर दोन्ही बाजूंकडून दिलगिरी व्यक्त

विधानभवनात झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात मध्यस्थी केलीये.. बावनकुळे आमदार गोपीचंद पडळकर यांना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे घेऊन गेले. झालेला प्रकार चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, असं असलं तरी विधानसभा अध्यक्षांकडे अद्याप यासंदर्भातला अहवाल आलेला नाही. अशातच, विधानसभा अध्यक्ष आणि सभापती याप्रकरणी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल.

Source link