Headlines

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: पोलिसांनी रात्री जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला कुठे नेलं, लोकेशन गुप्त, समोर आली मोठी अपडेट

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar:  पोलिसांनी रात्री जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला कुठे नेलं, लोकेशन गुप्त, समोर आली मोठी अपडेट
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar:  पोलिसांनी रात्री जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला कुठे नेलं, लोकेशन गुप्त, समोर आली मोठी अपडेट


मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याचं दिसून येतंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad vs Gopichand Padalkar) यांच्या शिविगाळनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल (गुरूवारी, ता-18) संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे जितेंद्र आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन सुरू केलं. यावेळी आव्हाडांनी सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली. (Jitendra Awhad vs Gopichand Padalkar)

यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं. अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं. आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवारही तेथे उपस्थित होते. मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केला आहे. रात्री उशिरा नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले, मात्र कोणत्या पोलीस स्टेटशनला घेऊन गेले हे उशिरा पर्यंत कळू शकले नाही, तर दुसरा आरोपी हृषीकेश टकलेची सेंट जॉर्ज रुग्णालयात रात्री 3 वाजता मेडिकल चाचणी करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे याठिकाणी दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशावरून हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

जितेंद्र आव्हाड यांनी काल (17 जुलै) रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळालं. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि जीपसमोरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली आहे. तर मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण राड्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे. ऐकूणच विधानभवनच्या परिसरात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि शिवीगाळमुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळ्याची आता सर्वच स्तरातून टीका होत आहे. तर दुसरीकडे पोलिसांचा कृतीवर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर कडाडून टीका केली आहे.   

दिलगिरी, मध्यस्थी आणि कारवाईची प्रतीक्षा!

विधानभवनात झालेल्या राडाप्रकरणी दोन्ही बाजूंकडून आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. बावनकुळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे नेले. या भेटीदरम्यान, “झालेला प्रकार चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं.” असे नमूद करत या घटनेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. असे असले तरी, विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणासंदर्भातला अधिकृत अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे, या राडाप्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि सभापती नेमकी कोणती कारवाई करतात, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेमुळे विधानमंडळाच्या कामकाजावर परिणाम झाला असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्येही चर्चा सुरू आहे.

मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा

दरम्यान, विधानभवन परिसरात सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी पोलीसी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली. तर यावेळी आव्हाड हे थेट पोलिसांच्या कार समोर ठिय्या देत होते. यावेळी त्यांनी कार रोखून धरली असता पोलिसांनी अक्षरक्ष: त्यांना फरफटत बाहेर ओढलं. त्यानंतर पोलिसांनी फौज बोलावली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं. तर दुसरीकडे गपचूप दुसरी गाडी बोलावून कार्यकर्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी आमदार आव्हाडांनी हे पाहिलं आणि परत राडा झाला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील हजार होते.

आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडले

विधिमंडळाचं अधिवेशन आज (18 जुलै) संपणार आहे, त्यापूर्वी आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी त्यांना नुकताच  आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेला वाद, त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली. यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. जितेंद्र आव्हाड या घटनेंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.  गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला. 

मात्र यात मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांना सोडून देत जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पकडून पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी अक्षरक्ष: जितेंद्र आव्हाड यांना बळाचा वापर करत बाजूला केलं. यावेळी सरकार विरोधात निदर्शने आणि या पोलिसांचा निषेध करण्यात आला. सुमारे तासभर सुरू असलेल्या या राड्याने परिसरात एकाच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.

मारहाणीच्या घटनेनंतर काय घडलं?

– आव्हाड कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर कार्यकर्ते हृषिकेश टकले यांना विधान भवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत ठेवण्यात आले 
– दोन्ही कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले 
– प्रत्यक्षदर्शी दोन्ही विधानभवनातील पोलिसांची साक्ष घेण्यात आली 
– मारहाणीच्या घटनेचे सभागृहात पडसाद उमटले त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांनी पोलिसांना तत्काळ वस्तुस्थिती मांडणारा अहवाल मागवला
– जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या खोलीत आले आणि नितीश देशमुखला घेऊन गेले यावेळी हृषिकेश देशमुख याला व्हीआयपी ट्रिटमेंट कशा प्रकारे देत आहे हे माध्यमांच्या लक्षात आणून दिलं (पोलीस टकलेला तंभाखू खायला घेऊन गेले होते)
– ९ वाजता विधिमंडळत अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला 
– अहवालात दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची बाब समोर आली 
– जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला सचिव जितेंद्र भोळे यांनी अधिवेशन संपल्यानंतर दोघांना सोडण्यात येईल असं सांगितलं मात्र प्रत्यक्षात नितीश देशमुख याला थांबवून ठेवण्यात आलं 
– विधानसभा अध्यक्षांनी माध्यमाशी बोलताना दोघींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं 
– रात्री उशिरा साडे बारा वाजता नितीन देशमुख याला पोलीस घेऊन जाण्यास निघाले मात्र जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी गाडी रोखली आणि आंदोलन सुरू केलं यावेळी रोहित पवार देखील आंदोलनात पोहोचले 
– नितीन देशमुख याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलीस घेऊन गेले आणि त्याच्यावर आणि हृषिकेश टकलेवर गुन्हा दाखल करण्यात आला 
– या दोघांना सध्या कुठे ठेवले आहे याबाबत सध्या तरी काहीच माहिती नाही 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *