
Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash : विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी जोरदार गोंधळ उडाला. विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला, त्यामध्ये त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी नुकत्याच झालेल्या वाद आणि त्यानंतर मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला. या विधानानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या लॉबीत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. त्यात आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पडळकर गटातील पाच कार्यकर्त्यांना सोडून दिले. मात्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा पोलीस देशमुख याला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनाला आडवून ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिसांनी आव्हाड यांना बळाचा वापर करत आव्हाडांना बाजूला केले. या गोंधळामुळे विधिमंडळाच्या संपूर्ण परिसरात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले.
मारहाणीच्या घटनेनंतर काय-काय घडलं?
1) जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले या दोघांना विधान भवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत ठेवण्यात आले होते.
2) यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
3) प्रत्यक्षदर्शी दोन्ही विधान भवनातील पोलिसांची साक्ष घेण्यात आली.
4) मारहाणीच्या घटनेचे सभागृहात पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांनी पोलिसांना तत्काळ वस्तुस्थिती मांडणारा अहवाल मागवला.
5) जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या खोलीत आले आणि नितीश देशमुखला घेऊन गेले. यावेळी ऋषिकेश देशमुख याला व्हीआयपी ट्रिटमेंट कशा प्रकारे देत आहे हे दिसून आले होते. (पोलीस ऋषिकेश टकलेला तंबाखू खायला घेऊन गेल्याचा व्हिडीओ समोर आला होता.)
6) रात्री 9 वाजता अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला.
7) अहवालात दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची बाब समोर आली.
8) जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला सचिव जितेंद्र भोळे यांनी अधिवेशन संपल्यानंतर दोघांना सोडण्यात येईल, असं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात नितीश देशमुख याला थांबवून ठेवण्यात आलं.
9) विधानसभा अध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं.
10) रात्री उशिरा साडे बारा वाजता नितीन देशमुख याला पोलीस घेऊन जाण्यास निघाले. मात्र, जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी रोखली आणि आंदोलन सुरू केलं. यावेळी आमदार रोहित पवार देखील आंदोलनात पोहोचले होते.
11) नितीन देशमुख याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलीस घेऊन गेले. त्याच्यावर आणि ऋषिकेश टकलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
12) या दोघांना पोलिसांनी सध्या कुठे ठेवले आहे? याबाबत सध्या स्पष्टता नाही.
आणखी वाचा
आणखी वाचा