Headlines

Mumbai Crime News: मजुरी करणाऱ्या तरूणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाची फुस लावली, तीन बहिणींनाही सोबत घेऊ पळाला, मुंबईत धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News: मजुरी करणाऱ्या तरूणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाची फुस लावली, तीन बहिणींनाही सोबत घेऊ पळाला, मुंबईत धक्कादायक प्रकार
Mumbai Crime News: मजुरी करणाऱ्या तरूणानं अल्पवयीन मुलीला प्रेमाची फुस लावली, तीन बहिणींनाही सोबत घेऊ पळाला, मुंबईत धक्कादायक प्रकार


मुंबई: मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे (Mumbai Crime News). इमारतीत लेबरचं काम करणाऱ्या आरोपीने तीन लहान मुलींना किडनॅप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत अवघ्या दहा तासात 3 लहान मुलीची सुटका करत आरोपीला अटक केली आहे. मालवणी परिसरात एका महिलेच्या तीन मुली घरात होत्या, त्यातील एक 15 वर्षांची होती, दुसरी 7 वर्षांची आहे, तर तिसरी मुलगी 1 वर्षाची आहे. तीन मुली घरात होत्या, महिला दुपारी दोन ते रात्री दोन वाजेपर्यंत कामासाठी जात असताना मुलींना घरामध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात होती. (Mumbai Crime News)

शेजारी इमारतीचा बांधकाम करणारा कामगाराने या 15 वर्षाची मुलीसोबत ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम सुरू झालं, प्रेमाचं रूपांतर लग्न करण्यापर्यंत पोहोचलं, यावेळी पंधरा वर्षाच्या मुलीने आपल्या सात वर्षाची आणि एका वर्षाच्या बहिणीला देखील सोबत घेऊन पळून जाण्याची अट घातली, यानंतर आरोपीने तिन्ही अल्पवयीन मुलीला घेऊन मालवणीतून बोरिवली आणि विरारच्या दिशेने ट्रेनने निघाले, अल्पवयीन मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करत, अवघ्या दहा तासामधून या आरोपीला विरारमधून अटक केली आहे, सोबत तिन्ही अल्पवयीन मुलीला देखील परत आणण्यात आलं आहे. (Mumbai Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीत लेबरचं काम करणाऱ्या आरोपीने तिघी बहिणींपैकी सर्वात मोठ्या पंधरा वर्षांच्या मुलीला प्रेमाची फूस लावून लग्नाचं आमिष दाखवलं, त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचं ठरवलं, तिने आपल्या लहान बहिणींना सोबत घेतलं, मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास केला आणि अवघ्या10 तासांमध्ये मुलींना परत आणण्यात आलं आहे. किडनॅपिंगच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीच नाव मोहम्मद अबू कलाम रहसूद्दीन शेख असं आहे, (18 वर्षे 6 महिने) तर तो बिहारचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Crime News)

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *