धारावी पुनर्वसन प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा Urban Renewal प्रकल्प आहे. या प्रकल्पात कोणतीही जमीन Adani ला थेट देण्यात आलेली नाही, तर ती DRP (Special Purpose Vehicle) ला दिली आहे, ज्यात महाराष्ट्र सरकार भागीदार आहे. धारावीतील अधिसूचित क्षेत्र २५१ हेक्टर असून, त्यापैकी केवळ १०८ हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष पुनर्वसनासाठी उपलब्ध आहे. प्रकल्पाचा प्राथमिक खर्च ९५,७९० कोटी रुपये आहे. १४ जानेवारी २०२५ रोजी पहिली बांधकाम परवानगी मिळाली असून, १०० टक्के पुनर्वसनासाठी सात वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन धारावीतच केले जाईल. तसेच, ज्यांचे उद्योग आणि व्यवसाय आहेत, त्यांनाही धारावीतच जागा दिली जाईल. धारावी हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून एक Economic Hub देखील आहे. येथील कारागीर आणि व्यावसायिकांना Organized Sector मध्ये आणले जाईल. त्यांना पाच वर्षांपर्यंत Tax Holiday देण्याचा निर्णय घेतला आहे. २०११ नंतरचे अपात्र लोक किंवा इतर कारणांनी अपात्र ठरलेल्यांनाही या प्रकल्पात घर दिले जाईल. त्यांना १२ वर्षांसाठी Rental Housing मध्ये ठेवल्यानंतर ते घर त्यांच्या नावावर केले जाईल. या माध्यमातून १० लाख लोकांना त्यांचे स्वतःचे घर मिळेल. पुनर्वसनासाठी ५४१ एकर जागा वेगवेगळ्या ठिकाणी DRP ला देण्यात येणार आहे, ज्यावर Commercial युनिट्स करता येणार नाहीत. ९० टक्के Home to Home सर्वेक्षण पूर्ण झाले असून, लोकांना प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. ‘Slum Free Mumbai’ चे स्वप्न या प्रकल्पातून पूर्ण होईल.