Headlines

मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मिरा भाईंदरमधील भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यासह, राजकीय वर्तुळातही राज त्यांच्या भाषणातून नेमकं काय बोलतील, मराठी-हिंदी वादावर त्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर, मीरा भाईंदर येथील सभेतून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. मुख्यमंत्र्‍यांनी त्रिभाषासूत्री महाराष्ट्रात लागू करणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं. त्यावर, राज ठाकरेंनी उत्तर देत, महाराष्ट्रात त्रिभाषासूत्री लागू केल्यास दुकानच नाही तर शाळाही बंद करू.. असे म्हटले. आता, राज ठाकरेंच्या भाषणावर भाजपने (BJP) पहिली प्रतिक्रिया दिला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका मांडली.  

मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीआधीपासून आहे. त्यासंदर्भात बोलताना, राज ठाकरेंनी मुंबई आणि गुजरात असा इतिहासही सांगितला. तर, महाराष्ट्रात त्रिभाषासूत्री करुन तर दाखवा, सरकारला आत्महत्या करायची असेल तर मग करा, असे राज यांनी म्हटले. राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

राज ठाकरेंनी तीच री ओढावी, हे दुर्दैवी

हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही. मात्र, राज ठाकरे तो जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी सक्तीची आहे मात्र हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केलंय, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं. तसेच, महापालिका निवडणुका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे, अशी भाषणं काही नेते वर्षानुवर्षे करत असतात. राज ठाकरेंनी तीच री ओढावी, हे दुर्दैवी आहे, असेही भाजप प्रवक्त्यांनी म्हटलं. 

मुंबई महाराष्ट्रापासून बाजुला करण्याचा डाव होता

मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता, गुजराती व्यापारी आणि गुजराती नेत्यांचा होता. आचार्य अत्रे यांचे पुस्तक वाचत असताना मला कळले,  ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात आंदोलन झाले, मोरारजी देसाई यांनी गोळ्या घालून मराठी लोकांना ठार मारले.  यांचा मुंबईवर डोळा आहे, हे तुम्हाला चाचपडून बघत आहेत. हिंदी भाषा आणली तर बघू मराठी माणूस जिवंत आहे का, जर तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणायचा पहिला प्रयत्न असेल, हळू हळू मुंबई गुजरातला मिळवायची हा यांचा प्रयत्न आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, हे सर्वप्रथम वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं, असा इतिहासही राज ठाकरेंनी सांगितला.

काय म्हणाले राज ठाकरे

तुमची भाषा आणि तुमची जमीन गेली तर तुम्हाला अर्थ नाही, कोणी विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणे गरजेचे आहे, हे फक्त महाराष्ट्रात काही गोष्ट झाली तर हिंदी चॅनेलवाले देशात चालू ठेवतात, ही ढेकणं आहेत सत्ताधाऱ्यांची. थोड्या वेळाने सुरू होतील, राज ठाकरेने उगला जहर, हे हिंदी चॅनेलवाले जाणून बुजून हा विषय घेतात. माझ्या बिहारच्या लोकांना विचारणे आहे, 28 सप्टेंबर 2018 गुजरातमध्ये 14 महिन्याचा एक मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर 20 हजार बिहारच्या लोकांना गुजरातमधून बाहेर काढले. त्या माणसाने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला, त्याला आमदार केले. यांच्या राज्यात हे करणार, त्यांना मारणार, झाल्या का बातम्या? नाही, इथे एका मिठाईवाल्याला मारले तर देशाची बातमी होते. अमराठी लोकांना कसे मारत आहेत, ही बातमी होते, आता पण गुजरातमध्ये बिहारी लोकांना मारत आहेत, असे म्हणत 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *