Headlines

Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच 22 बारबाला अश्लील…; FIR मध्ये नेमकं काय काय?

Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच 22 बारबाला अश्लील…; FIR मध्ये नेमकं काय काय?
Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच 22 बारबाला अश्लील…; FIR मध्ये नेमकं काय काय?


Ramdas Kadam On Savali Bar Mumbai: गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर विधान परिषदेत काल (18 जुलै) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आरोप केले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्या बारवर पोलिसांनी अश्लील नृत्य प्रकरणी कारवाई केल्याचा आरोप होता. 

एबीपी माझाने या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी सावली बारचा आढावा घेतला. या आढाव्यात माझाच्या हाती एफआयआरची कॉपी लागली आहे. हा बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्यानावे असल्याचा जबाब मॅनेजरने दिला होता. 30 मे या दिवशी या बारवर रात्री पोलिसांनी कारवाई केली. अश्लील नृत्य प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. एफआयआर कॉपीमध्ये नमूद माहितीनुसार 22 बारबाला, 25 ग्राहक, वेटर  कॅशियर आणि मॅनेजरला या छापेमारी मध्ये ताब्यात घेण्यात आला.

कदमांच्या बारवर धाड, एफआयआरमध्ये काय काय? 

1. कांदिवलीत ‘सावली बार’ वर  30 मे 2025 रोजी धाड

2. सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने

3. 30 मे च्या रात्री 10.50 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बार वर धाड

4. धाडीवेळी बारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि तीन कर्मचारी

5. काही बार बाला आणि ग्राहक अश्लील नृत्यात करत असल्याचे निदर्शनास

6. छाप्यानंतर वेटर,कॅशियर आणि मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात

7. बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असा मॅनेजरचा जबाब

8. धाडीनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

9. धाडीनंतर म्हणजे 31 मे पासून सावली बार बंद 

रामदास कदम काय म्हणाले?

‘सावली बार’ माझी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा आहे, अशी कबूली माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली. बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच आहे. नियमानुसार बार चालवणाऱ्यावर कारवाई होत असते, असं रामदास कदम म्हणाले. करारानुसार बारमध्ये काही झाल्यास चालवणाराच जबाबदार, असं रामदास कदम यांनी सांगितले. माझ्या पत्नीच्या नावे 30 वर्षांपासून परवाना आहे. व्यवसाय करणे हा गुन्हा आहे का?, अनिल परब अर्धवट ज्ञान असलेले वकील, अशी टीका रामदास कदम यांनी केली. 

अनिल परब यांचा नेमका आरोप काय?

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला. अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे अनिल परब यांनी म्हटले. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही अनिल परब यांनी केली होती. 

संबंधित बातमी:

Anil Parab on Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, 22 बारबाला पकडल्या, अनिल परबांचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *