
Devendra Fadnavis-Aditya Thackeray मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) काल (19 जुलै) संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईतील वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी सहा-सात वाजल्यापासून उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सोफिटेल हॉटेलला गेले होते. सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि नंतर एक तासाभराच्या अंतराने देवेंद्र फडणवीस पोहोचले. हे दोन्ही नेते साडेचार तासाहून अधिक वेळ या हॉटेलमध्ये होते. सोफिटेल हॉटेलमधील कॅफेटेरिया एरियामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल- आदित्य ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीच्या चर्चांवर आदित्य म्हणाले “आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय…आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या” असं म्हणत आदित्य ठाकरे निघून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिली. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.
तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप- देवेंद्र फडणवीस
आम्हाला 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही. मात्र, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहातच ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. त्यानंतर, सभागृहात चांगलाच हशा पिकला. मात्र, हे सभागृहातील खेळीमेळीचं वातावरण असल्याचं ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. मात्र, राजकीय वर्तुळात या ऑफरची चांगलीच चर्चा होत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा