
Central Railway : देवळाली (Deolali) ते नाशिक (Nashik) दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर ही घडली घटना आहे. ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा अगोदरच अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा ओव्हरहेड वायर तुटली होती. तेथील काम पूर्ण झाल्यावर नाशिकरोडजवळ वायर तुटली. सध्या रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
या प्रकाराने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली असून चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे 11113 देवळाली – नाशिक पॅसेंजर ही गाडी प्रवासासाठी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तर इतर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
वळविण्यात आलेल्या गाड्या (Diverted Trains)
– 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस – आझमगढ ही गाडी आज BSR-ST-JL-BSL- KNW मार्गे वळवण्यात आली आहे.
– 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा ही गाडी BSR-ST-JL-BSL-नागपूर मार्गे धावणार आहे.
– 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस BSR – ST – JL – BSL – KNW अयोध्या कैंट मार्गे वळविण्यात आली आहे.
– 22223 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शिर्डी साईनगर ही गाडी कळवा – लोणावळा – पुणे – डौंड छावणी – शिर्डी साईनगर मार्गे वळवण्यात आली आहे.
या गाड्यांच्या वेळेत बदल (Rescheduling)
– 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नांदेड पूर्वनिर्धारित वेळ: 05.30 वाजता होती. आता 08.30 वाजता प्रस्थान केले आहे.
– 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर पूर्वनिर्धारित वेळ: 06.35 वाजता, आता 10.00 वाजता प्रस्थान करणार आहे.
मुंबईत आज मेगाब्लॉक, लोकल सेवांवर परिणाम
आज मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि हार्बर मार्गवर मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये सीएसएमटी ते वांद्रे आणि चुनाभट्टी पर्यंतच्या मार्गावर सेवा प्रभावित होईल. तसेच, पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावर गोरेगाव ते बोरिवली पर्यंत सकाळी 10 ते 3 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लॉक घेतला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा