Headlines

Suraj Chavan and Ajit Pawar: आधी तटकरेंनी दौऱ्यातून वगळलं, आता अजित पवारांनी सूरज चव्हाणांना तातडीने बोलावून घेतलं, लातूरच्या राड्यानंतर राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोल सुरु

Suraj Chavan and Ajit Pawar: आधी तटकरेंनी दौऱ्यातून वगळलं, आता अजित पवारांनी सूरज चव्हाणांना तातडीने बोलावून घेतलं, लातूरच्या राड्यानंतर राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोल सुरु
Suraj Chavan and Ajit Pawar: आधी तटकरेंनी दौऱ्यातून वगळलं, आता अजित पवारांनी सूरज चव्हाणांना तातडीने बोलावून घेतलं, लातूरच्या राड्यानंतर राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोल सुरु


NCP Suraj Chavan beaten Chhava Sanghatana Workers: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये (Latur News) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर संताप व्यक्त केला होता. यावेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळले होते. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकार आणि राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे.

कालच्या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांनी आज सकाळी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत दिलगिरी व्यक्त केली. कालच्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती समोर आली. सूरज चव्हाण यांच्या मारहाणीनंतर छावाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. याचा फटका सुनील तटकरे यांच्या दौऱ्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी खबरदारी म्हणून सूरज चव्हाण यांना आपल्या दौऱ्यातून वगळल्याची माहिती आहे. परंतु, सूरज चव्हाण यांच्याकडून, माझे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे आपण लातूरमध्ये राहून उपचार घेणार आहे, असे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कालच्या राड्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तडकाफडकी मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अजित पवार सूरज चव्हाण यांना नुसती समज देणार की त्यांच्यावर कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Suraj Chavan: सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक अश्या दोन पथके सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी मार्गस्थ झाली आहेत.

आणखी वाचा

छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *