Headlines

एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढाच्या गिरीश महाजन, रामेश्वर नाईकांविरुद्ध जुन्या तक्रारीचं कनेक्शन शोधून काढलं, एसआयटी चौकशीची मागणी

एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढाच्या गिरीश महाजन, रामेश्वर नाईकांविरुद्ध जुन्या तक्रारीचं कनेक्शन शोधून काढलं, एसआयटी चौकशीची मागणी
एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढाच्या गिरीश महाजन, रामेश्वर नाईकांविरुद्ध जुन्या तक्रारीचं कनेक्शन शोधून काढलं, एसआयटी चौकशीची मागणी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात बऱ्याच  ठिकाणी हनीट्रॅपचे प्रकार घडायला लागलेले आहेत, असं म्हटलं.  नुकतंच नाशिकचं एक प्रकरण आलं होतं,ज्याच्यात 72  अधिकारी आणि काही लोकं अडकल्याचं, त्याची चौकशी सुरु आहे. दुसरं उदाहरण आता समोर आलं आहे, प्रफुल्ल लोढा म्हणून आमच्या जळगावातील जामनेरचा आहे. भाजपचा कार्यकर्ता आहे, गिरीश महाजनचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर देखील एक गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल लोढानं गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली असं एकनाथ खडसे म्हणाले. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली.    

एकनाथ खडसे पुढं म्हणाले की, प्रफुल लोढावर दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साकीनाका आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले. दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणं, छळणं, फोटो काढणं, ब्लॅकमेलिंग करणं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा हनीट्रॅपच्या संदर्भात अल्पवयीन मुलींना अमिष दाखवणं, फोटो काढणं यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात हा प्रफुल्ल लोढा कोण आहे? ⁠अनेक जण प्रश्न विचारत आहेत? प्रफुल्ल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता तो पहिला काँग्रेस मधे होता. नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता.  मग भाजप मधे गेला होता आणि त्याचा पक्षप्रवेश हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता आणि या पक्षप्रवेशाला मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक सुद्धा उपस्थित होते, असं एकनाथ खडसे म्हणाले.

प्रफुल लोढानं गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्या विरुद्ध तक्रार केलेली : एकनाथ खडसे

सरकारनं एका गोष्टीची चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे. गेल्या वर्षी याच प्रफुल्ल लोढा याने रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजन विरोधात एक तक्रार दाखल केली होती. आधी प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांचं खूप चांगलं होतं. नंतर तक्रार केली. तक्रार केल्यानंतर प्रफुल लोढाचं असं म्हणनं आहे की रामेश्वर नाईक जो मुख्यमंत्री कार्यालयात वैद्यकीय कक्षाचं काम पाहतो, त्यानं फोनवरुन जिवे मारण्याची धमकी दिली. एकनाथ खडसे यांनी प्रफुल लोढाचा व्हिडिओ देखील शेअर केला.  

याच प्रफुल्ल लोढा याने एक व्हिडिओ बनवला होता त्यात त्याने अनेक तथ्य मांडले आहेत. प्रफुल लोढानं त्या व्हिडिओत म्हटलंय की एक बटण दाबलं की संपूर्ण देशात हाहाकार माजेल. ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे माहिती असल्याचं लोढानं व्हिडिओत सांगितल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. या प्रफुल्ल लोढा कडे सगळे व्हिडिओ आहेत आणि याप्रकरणाची चौकशी स्थानिक पोलीस पारदर्शक पद्धतीने होऊ शकत नाही त्यामुळे याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले. प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केलेली आहे. 

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *