Headlines

Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया

Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया


Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईत 2006 सालच्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात (Mumbai Train Blast) हायकोर्टाने सर्व 12 आरोपींना दोषी ठरवलं होतं. यात पाच जणांना फाशीची आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. काल हायकोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली. शिक्षा झालेल्या 12 आरोपींपैकी एका आरोपीचा 2022 साली कोविडमुळे तुरुंगातच मृत्यू झाला होता.

मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला सवाल केला आहे. “या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र ATS च्या अधिकाऱ्यांविरोधात सरकार कारवाई करणार का? ज्यांच्यामुळे निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवण्यात आलं. आयुष्यातून आता चांगली वर्ष निघून गेल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका केली जाते” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. 

कोर्टाने काय म्हटलं?

1. आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत- हायकोर्ट

2. साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत- हायकोर्ट

3. स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य- हायकोर्ट

4. स्फोटांसाठी वापरलेले बाँब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश- हायकोर्ट

5. बॉम्बच माहित नाही तर मिळालेल्या बाँब, बंदुका,नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही- हायकोर्ट

6. बॉम्ब, बंदुका, नकाशे जुळून आले नाही- हायकोर्ट

नेमकं काय घडलेलं?

मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत पाच ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. 11 जुलै 2006 रोजी 11 मिनिटांत झालेल्या 7 स्फोटांनी मुंबई हादरली होती. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे.

2006 मुंबई स्फोटांचे खरे दोषी कुठे आहेत? ओवैसींचा सरकारला सवाल,VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Train Blast: मुंबईत 2006 साली 11 मिनिटांत 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू; पण आज 12 आरोपींची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *