
Devendra Fadnavis & Ajit Pawar Birthday: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज 56 व्या वयात पदार्पण करत आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) वयाच्या 67व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यासाठी अनेक विशेषणं वापरली आहेत. शिंदेंनी या दोन्ही नेत्यांची मुक्तकंठाने तारीफ केली आहे.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी देवाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा दिल्या?
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे
महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे
महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा!
सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
जीवेत शतम शरद:!!
Ajit Pawar Birthday: अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक; शिंदेंकडून अजितदादांचं कौतुक
महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा! अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक, डोळस विकासाचा निरंतर साथीदार, महाराष्ट्राच्या विकासाची आस असलेला संवेदनशील आणि वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासापुढे काहीही नाही, याची ठाम खूणगाठ बांधून वाटचाल करणाऱ्या या आमच्या मित्रास दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्चर चरणी प्रार्थना!
जीवेत शतम शरद:!!
Dharashiv News: अजितदादा भावी मुख्यमंत्री, धाराशिवमध्ये झळकले बॅनर्स
अजित पवारांची सासुरवाडी असलेल्या धाराशिवमध्ये पुन्हा ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स झळकले आहेत. अजित पवारांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. धाराशिव शहरात ऐन वर्दळीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
आणखी वाचा
महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची नाराजी दूर होणार?
आणखी वाचा