Headlines

Naigaon Accident : हृदयद्रावक! इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; मुंबईच्या नायगाव परिसरातील घटना

Naigaon Accident : हृदयद्रावक! इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; मुंबईच्या नायगाव परिसरातील घटना
Naigaon Accident : हृदयद्रावक! इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; मुंबईच्या नायगाव परिसरातील घटना


Naigaon Accident News नायगाव : मुंबईतील नायगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यात नायगावमधील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून पडून एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नायगाव पूर्व नवकार फेस वन या 14 मजल्याच्या टॉवरमध्ये काल(22 जुलै ) रात्री 8 वाजता ही घटना घडली आहे. अनविका प्रजापती असं मृत 4 वर्षाच्या चिमुरडीचे नाव असून नावकार सोसायटीच्या B-2 मध्ये ही चिमुरडी राहत होती.

चप्पल स्टॅण्डवर चढून खेळत असताना तोल गेला 

दरम्यान, काल सायंकाळी याच सोसायटीमधील B-3 मधील आपल्या वैनीच्या घरी चिमुरडी आली होती. घराच्या समोरील गॅलरीत चप्पल स्टॅण्ड ठेवला होता. त्या चप्पल स्टॅण्डवर चढून खेळत असताना तिचा तोल गेल्याने, 12 व्या मजल्यावरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला आहे.  मात्र चिमुरडीला तात्काळ वसईतील महापालिकेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरने उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. 14 माजल्याचे टॉवर असतानाही त्या टॉवरच्या गॅलरीला सुरक्षात्मक ग्रील नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  तर चिमुरडीचा मृत्यू झाल्याने पूर्ण नवकार सोसायटी परिसरात दुःखाचा डोंगर पसरला आहे.

विरारच्या नारंगी येथे मेलच्या महिला कोचवर दगडफेक; सुदैवाने जीवितहानी नाही

विरार नारंगी,  वैतरणा या दरम्यान 22 जुलै रोजी, 12921 फ्लाइंग राणी ही ट्रेन व्हीआर आउटर आणि नारिंगी एलसी दरम्यान जात असताना, अज्ञात इसमाने  एका दगडाने महिला कोचची खिडकीची काच फोडली. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमाराची असल्याची रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे. ही दगडफेक का व कोणी केली हे अद्याप समजू शकले नाही. आरपीएफ पोलीस ठाण्याच्या लँड लाइनवर फोन करून अधिकृत विचारणा केली असता या फोनवर फोन करू नका, असे आरपीएफच्या प्रवीण कुमार या अधिकाऱ्याने सांगितले, की मी ऑफीसमध्ये बसलो आहे. ऑफिसमध्ये येऊन बोला अशी उद्धट उत्तरे दिली. या दगडफेकीच्या घटनेमुळे रेल्वे प्रवाशामध्ये भीतीच वातावरण पसरल असून रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *