Headlines

Kalyan crime: मराठी तरुणीला मारहाण करुन गोपाळ झा अंडरग्राऊंड, लूक बदलून बाहेर पडला, मनसेच्या कार्यकर्त्यांना शेतातून पळताना पकडलं

Kalyan crime: मराठी तरुणीला मारहाण करुन गोपाळ झा अंडरग्राऊंड, लूक बदलून बाहेर पडला, मनसेच्या कार्यकर्त्यांना शेतातून पळताना पकडलं
Kalyan crime: मराठी तरुणीला मारहाण करुन गोपाळ झा अंडरग्राऊंड, लूक बदलून बाहेर पडला, मनसेच्या कार्यकर्त्यांना शेतातून पळताना पकडलं


Kalyan crime man beaten Hospital Receptionist: डोंबिवलीच्या पिसोली गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत संबंधित सोनाली कळासरे या तरुणीला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याचा छडा लावण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोकुळ झा (Gokul Jha) हा गायब झाला होता. कल्याण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होती. अखेर मंगळवारी रात्री नवाळी परिसरात तो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला.

गोकुळ झा यांनी आपली ओळख लपवण्यासाठी त्याचा लूक बदलला होता. गोपाळ झा हा नांदिवली परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो. त्यामुळे या भागात अनेकजण त्याला ओळखतात. मात्र, पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी गोकुळ झा याने केस कापले होते. नेहमीसारखा पोशाख न करता टी-शर्ट परिधान केला होता. नांदिवली परिसरामध्ये गोकुळ झा अनेकांच्या ओळखीचा असल्यामुळे त्याने त्याचा लुक बदलला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांपासून त्याचप्रमाणे जागरुक नागरिकांपासून आपला चेहरा लपवण्यासाठी त्याने स्वतःचा लूक बदलण्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही मध्ये दिसणारा त्याचा लुक आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरचा लुकमध्ये फरक असल्याचे दिसून आले आहे. गोकूळ झा याला लूक बदलल्यामुळे आपण पकडले जाणार नाही, याची खात्री वाटत होती. त्यामुळे तो मंगळवारी रात्री नेवाळी परिसरात फिरत होता. त्यावेळी मनसेच्या योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

MNS: मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळला कसं पकडलं?

मनसेचे ठाणेपालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते दिवसभर त्याला शोधत होते. अखेरीस रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांनी दिसला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून गाडीत टाकले आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले. गोकुळ झा याला पोलिसांकडून आज न्यायालयात सादर केले जाणार आहे.

आणखी वाचा

गोकुळ झाने मराठी तरुणीच्या छाती-पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारलं; आता डॉक्टरांची धक्कादायक माहिती, म्हणाले, पॅरालिसीस…

मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारणारा गोकुळ झा कोण? सगळी कुंडली समोर आली

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *