
-दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूय. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर दक्षिण सोलापुरातल्या वडजी परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तुफान पावसामुळे गावाचा रस्ता अक्षरशः वाहून गेलाय. गावातल्या खलाटे वस्ती, चेंडके वस्ती, भालेकर वस्ती, चिवरे वस्ती येथुन वडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जवळपास 25 ते 30 विद्यार्थी दररोज ये जा करीत असतात. पण रस्ता वाहून गेल्याने पावसाच्या पाण्यातुन शाळेतील लहान विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.