Headlines

Ketaki Chitale On Marathi Language Elite Status: मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? अभिजात दर्जा हवाच कशाला? केतकी चितळेची वायफळ बडबड, वादग्रस्त प्रश्नांनी ओढवून घेतलाय वाद

Ketaki Chitale On Marathi Language Elite Status: मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? अभिजात दर्जा हवाच कशाला? केतकी चितळेची वायफळ बडबड, वादग्रस्त प्रश्नांनी ओढवून घेतलाय वाद
Ketaki Chitale On Marathi Language Elite Status: मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? अभिजात दर्जा हवाच कशाला? केतकी चितळेची वायफळ बडबड, वादग्रस्त प्रश्नांनी ओढवून घेतलाय वाद


Ketaki Chitale On Marathi Language Elite Status: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Marathi Actress Ketki Chitale) आता आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये केतकी चितळेनं थेट मराठी भाषेच्या (Marathi Language) ‘अभिजात दर्जा’च्या (Marathi Language Elite Status) मागणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? ही तर निव्वळ ‘इन्सिक्युरिटी आहे, मराठी बोलणार नाही, न बोलल्यानं भोकं पडतात का? असं केतकी चितळे (Ketki Chitale) म्हणाली आहे. आपल्या विचित्र प्रश्नांनी स्वतः मराठी असूनही केतकीनं वाद निर्माण करत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. 

2024 मध्ये क्रायटेरिया काढला, मी त्याच्या विरोधात आहे, असं म्हणत केतकी चितळेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. केतकीचं म्हणणं आहे की, अभिजात भाषेसाठी हाच मुख्य निकष आहे.आपल्या व्हिडीओमध्ये केतकी चितळेनं म्हटलंय की, “आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे.”

…तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या : केतकी चितळे 

“हा जो काही क्रायटेरिया होता तो 2024 मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिक सांगायचं झालं तर, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या…”, असं केतकी चितळे म्हणते. 

पुढे बोलताना केतकीनं तिच्या विचार आणखी बोचणाऱ्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केतकी म्हणाली की, “एकाने मला असंही सांगितलं, माझ्या जवळच्या व्यक्तीने; त्याने मला सांगितलं की, हिंदी आणि उर्दूलासुद्धा दर्जा नाहीये. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे.” 

“माझं असं झालं की, ते का भांडतील? दर्जा पाहिजे, त्यामुळे फक्त इंसिक्योरिटी वाटते. दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे-दर्जा पाहिजे, त्यामुळे इंसिक्योरिटी आणखी वाढते.” असं म्हणत तिने मराठी भाषिकांच्या मागणीलाच ‘असुरक्षिततेचं’ प्रतीक ठरवलं आहे.

मराठी न बोलल्यानं भोकं पडतायत का? : केतकी चितळे 

“मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे! तो बोलेल नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना! तुम्ही तुमची स्वतःची इंसिक्योरिटी दाखवताय. त्याने काय फरक पडतोय? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.”, असं केतकी चितळे म्हणाली. 

दरम्यान, राज्यात आधीच हिंदी मराठी भाषेचा वाद उफाळला आहे. मायबोली मराठी भाषेसाठी मराठी माणूस एकवटला असून भाषा टिकवण्यासाठी सगळे एकजुटीनं उभे ठाकले आहेत. अशातच स्वतः मराठी असूनही केतकीनं मराठीबाबत जी मोठी गरळ ओकली आहे, त्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. 

मराठी भाषेबाबत गरळ ओकणारी केतकी चितळे काय म्हणाली?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: ‘सचिनसोबत माझी कधीच मैत्री नव्हती, त्याच्या…’; अशोक सराफ यांनी सगळंच स्पष्ट केलं

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *