Headlines

Sanjay Raut On Eknath Shinde And Shrikant Shinde: झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut On Eknath Shinde And Shrikant Shinde: झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Raut On Eknath Shinde And Shrikant Shinde: झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ


Sanjay Raut On Eknath Shinde And Shrikant Shinde मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या (25 जुलै) पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला. यासाठी 600 कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी केला आहे. हे घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनला वळवल्याचा आरोप राऊतांनी केलाय. याप्रकरणात झारखंडच्या पथकानं अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

झारखंडमधील एसीबीकडून अमित साळुंखेला अटक-

झारखंडमधील मध्य घोटाळ्याप्रकरणी अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. झारखंडमधील एसीबीकडून अमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे. अमित साळुंखे सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक असून महाराष्ट्रात सुमित फॅसिलिटी कंपनीला 108 नंबरच्या अॅम्बूलन्स चालवण्याचे कंत्राट देण्यात आलंय. तसेच अमित साळुंखे खासदार श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अमित साळुंखेच्या अटकेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. 

संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अतिशय जवळचा व्यक्ती असलेल्या सुमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे. झारखंडचं एसीबीचं पथक त्यांना महाराष्ट्रात येऊन अटक करुन घेऊन गेले, असं संजय राऊतांनी सांगितले. अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे आहे. हे सगळे पैसे श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे वळवले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. यामध्ये कोणाचे पैसे कोणाच्या मेडिकल फाऊंडेशनमध्ये गेलेत?, यामधील निवडणुकीत किती रुपये मागितले, हे समोर येईल, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात तब्बल 800 कोटींचा घोटाळा झालाय. देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ साफसफाईची गरज आहे, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला. 

जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर पोस्ट करत काय म्हणाले?

झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील कंत्राटदाराला अटक  करण्यात आली आहे. सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखेला झारखंड एसीबीकडून अटक केली आहे.महाराष्ट्रात सुमित फॅसिलिटी कंपनीला 108 नंबरच्या अॅम्बूलन्स चालवण्याचे कंत्राट देण्यात आलंय. झारखंडमध्ये सध्या दारू घोटाळा गाजत असून या घोटाळा प्रकरणात पुणेस्थित सुमित फॅसिलिटी कंपनीच्या संचालकाला अटक झाल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. झारखंडमध्ये सुमित फॅसिलिटी कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचे काम मिळाले होते. आतापर्यंत या घोटाळा प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आलीय. निविदा भरताना कमी सर्व्हिस चार्ज भरून कामे घ्यायची आणि असे घोटाळे करायचे, ही या कंपनीची मोडस ॲापरेंडी असल्याची माहिती मिळतंय. राज्यात 108 नंबरचे ॲम्बूलन्स चालवण्याचे काम सुमित फॅसिलिटीला देतानाही बराच वाद झाला होता आणि विरोधकांनी आरोपही केले होते, असं जितेंद्र आव्हाड पोस्ट करत म्हणाले आहे.

संजय राऊतांची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Politics: शिंदे गटाचे चार, भाजपमधूनही दोघे रडारवर; ‘रमीसम्राट’ कोकाटेंसह ‘या’ आठ मंत्र्यांची विकेट पडणार, सामनमधून सनसनाटी दावा

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *