Headlines

बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा

बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा
बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा


मुंबई : राज्यात हिंदी (hindi) आणि मराठीवरुन वाद सुरू असतानाच आता हा वाद सिनेमागृहातही पोहोचला आहे. कारण, सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर सैयारा या लव्हस्टोरी आधारीत हिंदी चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. तसेच, सिनेमागृहातही (Cinema) हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत असल्याने एकाचवेळी प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे, सैयारा (Saiyara) चित्रपटामुळे थेअटरमालकांनी मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी केल्यामुळे मनसे (MNS) आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये आता सामना होणार असल्याचं दिसून येत आहे. 

“सैयारा “सिनेमामुळे मराठी सिनेमा “येरे येरे पैसा 3” च्या स्क्रीन्स काढण्यात आल्याचा आरोप होत असून हिंदी-मराठी वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेत इयत्ता 1 ली पासून हिंदी भाषा सक्तीची नको म्हणत महाराष्ट्रात मनसेसह विरोधकांनी चांगलाच विरोध केला होता. त्यानंतर, राज्य सरकारने हा शासन आदेश मागे घेतला असून नव्याने समिती नेमण्यात आली आहे. एकीकडे हा वाद संपुष्टात आला असतानाच आता हिंदी आणि मराठी सिनेमावरुन वाद पेटला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख असलेल्या अमेय खोपकर यांची निर्मित्ती असलेला ‘येरे येरे पैसा 3’ च्या स्क्रीन कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच, मनसे पक्षातर्फे त्यांनी सिनेमा थेअटर मालकांना इशारा देखील दिला आहे. मराठी सिनेमांना स्क्रीन द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने ताळ्यावर आणू, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

मनसेचा मल्टीप्लेक्सवाल्यांना इशारा

मनसेच्या मराठी बाण्याचा सूड घेण्याकरता काही थिएटर मालकांचं षडयंत्र सुरु असल्याचा मनसेकडून आरोप होत आहे. थेअटर मल्टीप्लेक्स मालकांनी सैय्यारा चित्रपटासाठी स्क्रीन अडवून ठेवल्या आहेत. मनसे नेते अमेय खोपकरांची निर्मिती असलेल्या ये रे ये रे पावसा 3 या चित्रपटाऐवजी यशराज फिल्म्सच्या सैय्यारा चित्रपटाला स्क्रीन दिल्या जात आहेत, असे संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. आमची आज बैठक होती याबद्दल काही सांगता येणार नाही. पण, हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची गळचेपी होत आहे हे दिसून येत आहे. पण, आम्ही आत्ताच त्यांना सांगतो आहे की, ही गोष्ट आम्ही चालू देणार नाही. अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या सिनेमावर अशी गोष्ट होणं हे वाईट आहे. मल्टीप्लेक्सवाले हे जाणून-बुजून करत आहेत, त्यांना पक्षातर्फे आम्ही आता इशारा देतो, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.

हेही वाचा

 धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या…

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *