Headlines

Kalyan Hospital Receptionist Case: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या 'झा'चा माज काही उतरेना, आता पत्रकारांना दिली धमकी, पोलिसांसोबतही अरेरावी

Kalyan Hospital Receptionist Case: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या 'झा'चा माज काही उतरेना, आता पत्रकारांना दिली धमकी, पोलिसांसोबतही अरेरावी
Kalyan Hospital Receptionist Case: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या 'झा'चा माज काही उतरेना, आता पत्रकारांना दिली धमकी, पोलिसांसोबतही अरेरावी


कल्याण: कल्याणमधील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा गोकुळ झा (Gokul Jha) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. (Kalyan Crime news) त्यानंतर कोर्टाने गोकुळला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं आहे. मात्र पोलीस कोठडीतून कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याने पत्रकारांना धमकी दिली. “परत तुम्हाला भेटतो,” असं तो पत्रकारांना म्हणाला आणि त्याने पोलिसांशी देखील अरेरावी यावेळी आरेरावी केली.

गोकुळ झा याने कल्याणमधील एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या तरुणीला मारहाण केली होती. या प्रकरणी तो फरार होता. सामान्य नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली. तो एका गुन्ह्यात शिक्षा भोगून नुकताच तुरुंगातून बाहेर आला होता. पोलिसांनी गोकुळ झा याच्यासह त्याच्या भावाला, रणजितला देखील ताब्यात घेतले आहे. गोकुळ झा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अशातच कल्याण प्रकरणात आपल्याविरुद्ध झालेल्या वार्तांकनामुळे चिडलेल्या गोकुळने आज कोर्टात हजर होण्यापूर्वी पत्रकारांना धमकी दिली. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

“तुम्ही सगळं चुकीचं छापलं आहे. तुम्ही हे चुकीचं केलं आहे. आपली लवकरच भेट होईल,” असं म्हणत गोकुळ झा याने आज पोलिसांसमोर पत्रकारांना धमकी दिली. तसंच पोलिसांशीही हुज्जत घातली. त्यामुळे तरुणीला मारहाण करणाऱ्या या आरोपीची मस्ती अजूनही कायम असल्याचंच दिसत आहे. तरुणीला मारहाण केल्याप्रकरण आरोपी गोकुळ झा हा दोन दिवस पोलिस कोठडीत होता. झा ची पोलीस कोठडी संपली त्याला डोंबिवली मानपाडा पोलीस कल्याण न्यायालयात पुन्हा हजर करण्यासाठी घेऊन जाताना पोलिसांना अरेरावी करत  असताना दिसला. पोलिसांसमोरच पत्रकारांना आरोपी गोकुळ झा याने धमकी दिली, परत तुम्हला भेटतो असंही त्याने यावेळी म्हटलं आहे.

गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार

गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या नावावर कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.

गोकुळ झा हा चार दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गोकुळवर याआधी दोन गुन्हे दाखल आहेत. ⁠हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे, असे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ⁠एक गुन्हा विठ्ठलवाडी आणि एक गुन्हा कोसळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ⁠एका गुन्ह्यांत त्याने हत्याराने मारहाण केली होती तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. ⁠कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सदरील ट्रक चालकाने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *